अलास्का भूकंपाच्या धक्क्याने हादरले

अलास्का भूकंपाच्या धक्क्याने हादरले

अलास्कामध्ये भूकंपाचे धक्के

अमेरिकेच्या अलास्का प्रांत तीव्र भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. अलास्काच्या अलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीपमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाच्या धक्क्यामुळे जमीन खचली, रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत. ज्यावेळी भूकंपाचा धक्का बसला त्यावेळी सर्व नागरिक इकडे तिकडे पळत होते. सुदैनाने जिवीतहानी झाली नाही. मात्र घर, बिल्डिंग,रस्ते, पूलांचे मोठे नुकसान झाले आहे. भूकंपानंतर ‘नॅशनल ओशियनिक अॅण्ड अॅटमोस्फियरिक एडमिनिस्ट्रेशन’ यांच्याकडून त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, उत्तर अमेरिकेतील कॅनेडियन क्षेत्राचं मूल्यांकन केल्यानंतर त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला. अलास्कामधील १० हजारापेक्षा अधिक नागरिकांना या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला आहे.

सुदैवाने जीवितहानी नाही

या भूकंपाचा केंद्रबिंदू एंकोरेज या शहराजवळ उत्तरेला ७ मैल अंतरावर होता. भूकंपाची तीव्रता इतकी होती की, सुमारे ४० वेळा कंपनं जाणवली. भूकंपानंतर वीजपुरवठा खंडीत झाला आहे. याचा फटका सुमारे १० हजार नागरिकांना बसला आहे. एंकोरेज आणि परिसरातील क्षेत्रात सुमारे ४ लाख नागरिक वास्तव्य करतात, अशी माहिती मिळाली आहे. पण सुदैवाने अद्याप कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

First Published on: December 1, 2018 3:02 PM
Exit mobile version