काही लोक देशाची संपत्ती लुटतायत, मल्लिकार्जुन खरगेंचा गौतम अदानींवर निशाणा

काही लोक देशाची संपत्ती लुटतायत, मल्लिकार्जुन खरगेंचा गौतम अदानींवर निशाणा

काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित 2021 ची दशवार्षिक जनगणना घेण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रायपूरमधील काँग्रेसच्या महाअधिवेशनातून मोदी सरकार आणि देशातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काही लोकं देशाची संपत्ती लुटत आहेत. मोदी आमच्याकडून प्रत्येक मालमत्ता आणि संपत्ती खरेदी करत आहेत आणि ही मालमत्ता आणि संपत्ती एका व्यक्तीला देत आहेत. आता ही व्यक्ती हत्ती एवढी मोठी झाली आहे, असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी अदानींवर हल्लाबोल केला आहे.

सध्या रायपूरमध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन सुरू आहे. यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही मोदी सरकारला घेरले. मला अजून एक गोष्ट समजली नाही. संसदेत मी गौतम अदानी यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा मी म्हणालो होतो की, अदानी ६०९ क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर कसे काय आले?, तुम्ही जी फॉरेन पॉलिसी बनवता. त्याचा फायदा सर्वत्र होतो. मी फक्त मोदींना विचारलं होतं की, मला सांगा तुमचे त्यांच्यासोबत काय संबंध आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.

आता तुमच्या लक्षात आले असेल की संपूर्ण सरकार, सर्व मंत्री गौतम अदानींना संरक्षण देऊ लागले आहेत. अदानींवर हल्ला करणारा देशद्रोही आहे, असे म्हटले जाते. म्हणजे अदानी सर्वात मोठे देशभक्त झाले आहेत आणि भाजप-आरएसएस या व्यक्तीला संरक्षण देत आहे. भाजपच्या सर्व मंत्र्यांना या व्यक्तीला संरक्षण द्यावे लागत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.


हेही वाचा :भाजप सरकारमुळेच शेतकरी आणि शेतीची अवस्था दयनीय, नाना पटोलेंचा आरोप


 

First Published on: February 26, 2023 3:49 PM
Exit mobile version