मुख्य सचिव बंधोपाद्यायांना दिल्लीत पाठवणार नाही, ममतांचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुख्य सचिव बंधोपाद्यायांना दिल्लीत पाठवणार नाही, ममतांचे पंतप्रधान मोदींना पत्र

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलप्पन बंधोपाध्याय यांची केंद्र सरकारने बदली केली आहे. बंधोपाध्याय यांना सोमवारी दिल्लीत दाखल व्हायला सांगितले होते. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपण मुख्य सचिव बंधोपाध्याय यांना पाठवणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या या आदेशामुळे आपण हैरण आणि स्तब्ध आहे. कोरोनाच्या काळात बंधोपाद्याय यांना पाठवणार नाही तर ते त्यांच्या पदावर राहून कोरोनाविरोधातील लढ्यात बंगालला मदत करत राहतील असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पश्चिम बंगालचे सरकार मुख्य सचिवांना पदावरुन सोडू शकत नाही आणि सोडणार नाही. लागू कायद्याच्या अनुषंगाने कायदेशीर चर्चा केल्यानंतर मुदतवाढीचा पुर्वीचा आदेश लागू होता आणि तो मान्यही होता. असे ममतांनी पत्रात म्हटले आहे. तसेच आम्हाला खात्री आहे की, तुमच्या आदेशामुळे राज्यातील नागरिकांना कोणत्याही अडचणीत आणि अडथळा आणणार नाहीत.

दरम्यान ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, बधोपाध्याय यांना नुकताच वैयक्तिक शोक सहन करावा लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंगालमध्ये त्यांची मुदत ३ महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. तसेच ममतांनी कुलाईकुंडाचा उल्लेख करत विचारले आहे की, कलाईकुंडा येथील बैठकीबाबत काही शंका आहे की, परंतु मला आशा आहे की आशा प्रकारचे कोणतेही कारण नसेल आणि तरीही असे असेल तर ते दुःखदायक आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण जनतेच्या हितानुसार प्राथमिकता ठरवली जाते असे ममतांनी म्हटले आहे.

कलाईकुंडा बैठकीत काय झाले

पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसला आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहणी दौरा केला. यावेळी पंतप्रधान मोदी कलाईकुंडा येथे पोहचेले होते. कलाईकुंडा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पंरतु या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तब्बल आर्धा तास वाट पाहावी लागली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव बंधोपाद्याय यांना यायाला ३० मिनिट उशीर झाला होते.

बैठकीला उपस्थित होते शुभेंदू अधिकारी

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना म्हटले आहे की, बैठकीत आपल्यासोबत चर्चा करण्याची इच्छा होती. परंतु मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात जशी बैठक होते तशी झाली नाही. यामध्ये आपण भाजपच्या आमदाराला बोलावले होते. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांचे काहीही काम नसल्याचे पत्रात म्हटले आहे.

मुख्य सचिवांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश

बंगालचे मुख्य सचिव अपप्पन बंधोपाद्याय यांना सोमवारी दिल्लीतील केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण विभागात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मुख्य सचिवांना कार्यमुक्त करणार नाही आणि दिल्लीला पाठवणार नाही असे म्हटले असल्यामुळे मुख्य सचिव दिल्लीत पोहचू शकले नाही आहेत. पश्चिम बंगालमध्ये यास चक्रिवादळाने मोठे नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य सचिवांमध्ये बैठक घेण्यात येणार असून ते त्या टास्क फोर्सचे प्रमुख असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

First Published on: May 31, 2021 5:08 PM
Exit mobile version