ममता बॅनर्जी- नितीन गडकरी यांची भेट, पश्चिम बंगालमधील उद्योग, रस्त्यांबाबत केली चर्चा

ममता बॅनर्जी- नितीन गडकरी यांची भेट, पश्चिम बंगालमधील उद्योग, रस्त्यांबाबत केली चर्चा

ममता बॅनर्जी- नितीन गडकरी यांची भेट, पश्चिम बंगालमधील उद्योग, रस्त्यांबाबत केली चर्चा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. गुरुवारी ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी आतापर्यंत पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल अशा अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील रस्ते आणि ऑटो उद्योगांबाबत चर्चा केली आहे. गडकरी यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी मुख्य सचिवांना दिल्लीत दाखल होण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याच्या विकासात्मक विषयांवर ममता बॅनर्जी यांनी चर्च नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी उद्योगांबाबत चर्चा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये नव्या उद्योगांना चालना मिळेल असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, पश्चिम बंगालमध्ये नवे उद्योग स्थापित झाले तर फायदेशीर ठरेल. बंगालमध्ये इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक ऑटो आणि इलेक्ट्रिक स्कूटर बनवल्यास चांगले होईल. तसेच राज्याच्या सीमा या बांग्लादेश, नेपाळ, भूटान आणि उत्तर-पूर्व राज्यांकडेही रस्ते जात आहेत यामुळे राज्यात चांगले रस्ते आवश्यक असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

मुख्य सचिवांना दिल्लीत येण्याच्या सूचना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी मुख्य सचिवांना दिल्लीला येण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील रस्त्यांच्या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. नितीन गडकरी यांनी भेटीची वेळ दिली असून पीडब्लूडी मंत्री, सेक्रेटरी, ट्रांसपोर्ट सेक्रेटरी आणि नितीन गडकरी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहणार नसून मुख्य सचिव बैठकीला हजर राहणार आहेत.

First Published on: July 29, 2021 7:44 PM
Exit mobile version