गर्लफ्रेंडला मेसेज करणं पडलं महागात

गर्लफ्रेंडला मेसेज करणं पडलं महागात

(फोटो प्रातिनिधीक आहे.)

जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला सतत मेसेज करत असाल तर थोडं थांबा. कारण हे मेसेज करणं एका बॉयफ्रेंडला इतकं महागात पडलं की, त्याला थेट पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी त्याला चक्क कोट्यवधी रुपयांचा दंड भरावा लागला. हे ऐकून ही घटना कुठे घडली असा प्रश्न पडला असेलच ना! ही घटना अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये घडली आहे.

नेमकं प्रकरण काय?

३३ वर्षीय रॉलचं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं. पण त्याने त्यानंतरही तिचा माग सोडला नाही. तिला त्रास देण्यासाठी तिला त्याने ४ हजार मेसेजेस पाठवले आणि ३०० हून जास्त कॉल केले. इतक्यावर न थांबता आपला राग व्यक्त करण्यासाठी त्याने तिची सगळी सोशल अकाऊंटस, बँकेंचे अकाऊंट हॅक केलं. तिने अनेकदा फोन नंबर बदलून पाहिले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण प्रत्येकवेळी तिचा अॅपल आयडी, इमेल पासवर्ड तो हॅक करायचा आणि तिच्या प्रत्येक हालचालीवर  त्याने ऑनलाईन पाळत ठेवायचा. हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर तिने पोलिस स्टेशन गाठलं. तिच्या तक्रारीनंतर रॉलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

(फोटो प्रातिनिधीक आहे.)

सतत ठेवायचा पाळत

ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या एक्स गर्लफेंडने तिचा मोबाईल नंबरदेखील बदलला. इतकं करुनही तो तिच्यावर पाळत ठेवून होता. ती काहीच प्रतिसाद देत नाही हे कळाल्याबरोबर तिने त्याच्या घराबाहेर तळ ठोकलं. तिला तिच्या घरी राहणंही कठीण होऊन गेलं होतं. त्याला कंटाळून तिने घर सोडलं तरीसुद्धा तो तिचं नवं ठिकाणं शोधून काढायचा आणि तिला धमकी द्यायचा.

कोट्यवधी रुपये देऊन केली सुटका

रॉलचा हा गुन्हा गंभीर आहे. त्याला कठोर शिक्षा मिळावी अशी अपेक्षा तिची होती. पण जामिनावर त्याने त्याची सुटका करुन घेतली. त्यासाठी त्याला कित्येक कोटी मोजावे लागले. भारतीय चलनानुसार त्याने सुटकेसाठी १, २ नाही तर तब्ब्ल ६७ कोटी रुपये मोजले असल्याची माहिती एनडिटीव्हीने  केलेल्या बातमीतून कळतं आहे.

First Published on: June 15, 2018 10:18 AM
Exit mobile version