प्रेयसीच्या घरात सिलिंडरचा स्फोट घडवून आणणार तेवढ्यातच…

प्रेयसीच्या घरात सिलिंडरचा स्फोट घडवून आणणार तेवढ्यातच…

प्रेयसीच्या घरात सिलिंडरचा स्फोट घडवून आणणार तेवढ्यातच...

एका युवकाने प्रेयसीच्या घरातच गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. चेन्नईच्या विरुगामबाक्कममध्ये शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; तो युवक घरातच गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून प्रेयसी आणि तिच्या आई- वडिलांना मारण्याच्या प्रयत्नात होता.

नेमके काय घडले?

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार; विरुगामबाक्कम येथे एक कुटुंब राहत असून त्यांच्या घरात तरुणीचे आई-वडिल आणि तिचा प्रियकर राहत होते. दरम्यान, मुलगी आणि तिचे आई-वडिल बेडरुममध्ये झोपले असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घरात कसला तरी आवाज झाल्याने उठले. त्यांनी पाहिले असता, तेव्हा युवक सिलिंडर खेचून हॉलमध्ये आणत होता. तो घरात सिलिंडरचा स्फोट घडवण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात आल्यानंतर मुलीने आणि तिच्या आई-वडिलांनी त्याला घराबाहेर ढकलले आणि दार बंद करुन घेतले. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली.

दरम्यान, पोलीस दाखल होण्याआधीच युवकाने तुटलेल्या काचेच्या तुकड्याने स्वत: चा गळा चिरुन घेतला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी तरुणाला कॉरिडोअरमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्या युवकाला मृत घोषित केले.


हेही वाचा – अवघ्या ५०० रूपयात कोरोनाची चाचणी, एका तासात निकाल


 

First Published on: October 5, 2020 7:25 PM
Exit mobile version