संतापलेल्या पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकले मोटारसायकलचे हँडल

संतापलेल्या पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकले मोटारसायकलचे हँडल

प्रातिनिधिक फोटो

इंदोरमध्ये एका नवऱ्याने अमानुषपणाचा कळस गाठला आहे. दोन वर्षापूर्वी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसोबत वाद झाले. या वादानंतर संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या गुप्तांगामध्ये मोटारसायकलचे हँडल घातले. त्यानंतर तिचे एम वाय हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करुन हँडल काढले. ४ तास ऑपरेशन चाललेल्या हे ऑपरेशन १८ डॉक्टरांमुळे यशस्वी झाले आहे. दरम्यान, महिलेची प्रकृती पुढच्या ७२ तास गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तिच्यावर सध्या डॉक्टरांच्या निगरानीखाली उपचार सुरु आहे.

असे झाले ऑपरेशन?

महिलेच्या पोटामध्ये खूप दुखत असल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एन वाय हॉस्पिलटलमधील डॉ. सोमेन भट्टाचार्य यांच्यासह १८ डॉक्टरांच्या टीमने हे ऑपरेशन केले. या डॉक्टरांनी तब्बल ४ तास ऑपरेशन केले त्यानंतर त्यांनी महिलेच्या शरीरातील मोटारसायकलचा हँडल काढला. ऑपरेशननंतर पुढचे ७२ तास महिलेसाठी क्रिटिकल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हँडलमुळे महिलेच्या पोटातील अवयवांना मोठे नुकसान पोहचले आहे.

हे होते वादाचे कारण

मिळालेल्या माहितीनुसार, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या संबंधामध्ये पीडित महिला नाराज होती. याच मुद्द्यावरु त्यांच्यामध्ये सतत भांडण होत होते. भांडणानंतर संतप्त झालेल्या महिलेच्या पतीने तिला दारु पाजून तिच्या गुप्तांगामध्ये मोटारसायकलचे हँडल टाकले. लाजेखातर ही बाब महिलेने दोन वर्ष कोणालाच सांगितली नाही. या काळामध्ये इन्फेक्शन तिच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरले आणि तिला चालणे-फिरणे कठीण झाले. पोटातील दुखणे असह्य झाल्यानंतर महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. तिची व्यथा ऐकूण पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. महिलेने अनेकदा चंदननगर पोलीस ठाण्यात पती मराहाण करत असल्याची तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी तिची तक्रार गंभिरतेने घेतली नाही.

हँडलमुळे महिलेच्या पोटात अनेक जखमा

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकलच्या हँडेल २ वर्ष शरीरात राहिल्यामुळे तिच्या शरीराच्या आतील अंगाला गंभीर इजा झाली आहे. तिच्या पोटातील अनेक नस तुटल्या आहेत. सोनोग्राफी आणि सिटीस्कँनमधून हे माहिती पडले की, हँडल पोट आणि गर्भाशयाच्या मध्ये अडकला आहे. या हँडलची लांबी जवळपास १५ सेमी आणि रुंदी ३ सेमी होती.

First Published on: May 15, 2019 2:23 PM
Exit mobile version