हरवलेलं वॉलेट एका नव्या गिफ्टसोबत पुन्हा मिळाले

हरवलेलं वॉलेट एका नव्या गिफ्टसोबत पुन्हा मिळाले

हरवलेलं वॉलेट एका नव्या गिफ्टसोबत पुन्हा मिळाले

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतं. व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि हल्ली तरुणांमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे टिकटॉक… त्यामुळे एखाद्याला कोणतीही गोष्ट सांगायची असल्यास सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे आता पेनाने पत्र लिहीणे कठीणच झाले आहे. तसेच असे कोणी पत्र लिहीले तर खरचं आश्चर्य देखील वाटते. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतल्या हंटर शमेटसोबत घडली आहे. खरं तर हंटर याचं वॉलेट विमानात हरवलं होत. मात्र त्याला ते पुन्हा मिळालं पण एका सरप्राइज गिफ्यसोबत.

वॉलेट हरवल्याचे केले फेसबुकवर पोस्ट

हंटर काही दिवसांपूर्वी बहिणीच्या लग्नाकरिता लास वेगासला गेले होते. त्यादरम्यान त्यांचे वॉलेट हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. वॉलेट हरवल्यामुळे हंटर विचलित झाला होता. त्यामुळे हंटरची आई जिनी शमेट यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट टाकली. त्या पोस्टमध्ये लिहिलं होत की, हंटरच्या हरवलेल्या वॉलेटमध्ये ६० डॉलर कॅश, ४०० डॉलरचा एक पे – चेक, डेबिट कार्ड आणि आयडी कार्ड होतं. मात्र त्यांनी याबाबत जास्त विचार केला नसून त्यांनी पालकांकडून पैसे उधारीवर घेतले आहेत. असे त्यात हंटरच्या आईने लिहीले होते.

अखेर प्रवास करण्यास परवानी मिळाली

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, हंटरचे वॉलेट हरवल्यानं फारच अडचणीत सापडला होता. त्यांना त्यांना आपलं वॉलेट विमानात पडलं असावं असे वाटले. त्यनुसार त्यांनी याबाबतची माहिती फ्रँटियर विमान प्रशासनाला दिली. परमतु विमान प्रशासनाने असे कोणतेही वॉलेट आढळले नसल्याचे सांगितले. त्यानंतर हंटर बहिणीचं लग्न उरकून जेव्हा पुन्हा लास वेगासवरुन स्वत:च्या घरी ओमाहा जात होते. त्यावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावेळी त्यांच्याकडे आयडी नसल्याने त्यांना असंख्य अडचणी आल्या मात्र एका तासाने त्यांना प्रवास करण्याची परवानगी मिळाली.

पुढे काय घडले?

हंटर सांगतात, जोव्हा ते ओमाहाला पोहोचले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना एक पार्सल आला. या पार्सलमध्ये हंटर यांचे हरवलेले वॉलेट होते. मात्र हे नुसतेच वॉलेट नसून त्यासोबत एक चिठ्ठी देखील होती. या चिठ्ठीमध्ये असे लिहिले होते की हंटर मला तुमचं हे वॉलेट ओमाहाहून लास वेगासला जाणाऱ्या फ्रंटियर फ्लाइटच्या १२ व्या लाइनच्या सीट एफ आणि दिवाळाच्या मध्ये मिळालं. मला वाटलं तुम्हाला याची गरज असेल, ऑल द बेस्ट. मी तुमच्या ६० डॉलर कॅशचे १०० डॉलर केले आहेत. जेणेकरुन तुम्हाला वॉलेट मिळेल तेव्हा तुम्ही आनंदाने पार्टी करु शकाल. वॉलेट पुन्हा मिळाल्यानं हंटरच्या कुटुंबियाने त्या अज्ञात व्यक्तीचे आभार मानले असून जर आम्ही त्या व्यक्तीला शोधू शकलो तर त्यांचे व्यक्तीगत स्वरुपात आभार मानू असे देखील त्यांनी सांगितले आहे.

First Published on: November 28, 2018 10:26 PM
Exit mobile version