मंगळुरू ऑटो बॉम्बस्फोटप्रकरणी मोठा खुलासा; आरोपी शारिक होता ISIS च्या संपर्कात

मंगळुरू ऑटो बॉम्बस्फोटप्रकरणी मोठा खुलासा; आरोपी शारिक होता ISIS च्या संपर्कात

कर्नाटकातील मंगळुरू शहरात 19 नोव्हेंबर ऑटो बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीची पोलिसांनी ओळख पटवली आहे. या स्फोटात ऑटोचालक पुरुषोत्तमसह शारिक मोठ्याप्रमाणात भाजला आहे. सध्या या दोघांवर मंगळुरु रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोहम्मद शरीक या आरोपीने हा स्फोट घडवून आणला आहे. शरीकबाबत पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद शरीक हा इस्लामिक स्टेट (ISIS) च्या हस्तकांच्या संपर्कात होता आणि त्याने यापूर्वी शिवमोग्गा येथे बॉम्बस्फोटाचे ट्रायल केले होते.

या बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एडीजीपी (एडीजीपी) आलोक कुमार यांनी सांगितले की, 19 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.40 वाजता मंगळुरू शहराबाहेर एका ऑटोमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट झाला. या घटनेत प्रवासी आणि वाहनचालक होरपळले. ऑटो चालकाचे नाव पुरुषोत्तम पुजारी असे असून प्रवाशाचे नाव शारिक असे आहे.

आरोपी शरीकविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत, दोन मंगळुरू शहरात आणि एक शिवमोग्गा येथे आहे. हे दोन्ही गुन्हे UAPA अंतर्गत दाखल करण्यात आला असून तिसऱ्या गुन्ह्यात तो वॉन्टेड होता. आरोपी बराच काळ फरार होता.

जंगलात केला होता ट्रायल ब्लास्ट

तुंगा भद्रा नदीच्या काठावरील जंगलात शरीकने अन्य दोन साथीदारांसह ट्रायल स्फोट घडवून आणला होता, अशी माहिती 19 सप्टेंबर रोजी समोर आली होती. या घटनेनंतर 20 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी माज मुनीर आणि सय्यद यासीन यांना अटक केली. मात्र शाकीर पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर तो म्हैसूरमध्ये चोरीचे आधार कार्ड घेऊन भाड्याने घर घेऊन बॉम्ब बनवण्याचा सराव करत होता.


भारतातून फरार असलेला झाकीर नाईक ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये करणार ‘इस्लामचा प्रचार’

First Published on: November 21, 2022 4:29 PM
Exit mobile version