गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच असणार – अमित शहा

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच असणार – अमित शहा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे राज्याला नवीन मुख्यमंत्री येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मनोहर पर्रिकर हेच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट केले आहे. अमित शहा यांनी ट्विट करून गोव्याचे नेतृत्व पर्रिकरांकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकतीच गोवा प्रदेश भापज कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शहा यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. मात्र राज्य सरकारच्या मंत्रीमंडळात तसेच विभागात बदल करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मंत्रीमंडळातही होणार फेरबदल

अमित शहा यांनी म्हटले आहे की, गोव्याच्या प्रदेश भाजप कोअर कमिटीच्या सदस्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे की गोव्याचे मुख्यमंत्री हे मनोहर पर्रिकरच राहणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या मंत्रीमंडळामध्येही लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत.

काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा

दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्याच्या नेतृत्वासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे राज्याचा कारभार सांभाळले त्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. काँग्रेसने गोव्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव मांडला होता.

First Published on: September 23, 2018 7:42 PM
Exit mobile version