पर्रिकरच राहणार गोव्याचे मुख्यमंत्री

पर्रिकरच राहणार गोव्याचे मुख्यमंत्री

गेल्या काही महिन्यांपासून स्वादूपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याऐवजी दुसरा नेता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी निवडला जाणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र गोव्यात नेतृत्व बदल होणार नसल्याची माहिती गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केल्याने आता गोव्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच मनोहर पर्रिकर हे अमेरिकेत उपचार करून पुन्हा गोव्यात परतले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पर्रिकर हे मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आज तेंडुलकर यांनी गोव्यात नेतृत्व बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले तेंडुलकर

मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती स्थिर झाली असून, तेच सरकारचे नेतृत्व करतील. इतर काही बदल होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली परंतु ते बदल कोणते हे काही स्पष्ट केले नाही. मुख्यमंत्री पदाचा ताबा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर किंवा नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सोपविण्याच्या प्रस्तावाविषयी विचारले असता, सध्या त्याची कोणतीही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा – मनोहर पर्रिकर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होणार

First Published on: September 16, 2018 7:01 PM
Exit mobile version