वाचा – मनोहर पर्रिकर यांचा राजकीय प्रवास

वाचा – मनोहर पर्रिकर यांचा राजकीय प्रवास

मनोहर पर्रिकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे सहकारी होते

मनोहर पर्रिकर आपल्या शालेय जीवनातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) सामील झाले होते. शिक्षणासोबतच त्यांनी आरएसएसच्या युवा शाखेसाठी काम करायला सुरुवात केली. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुन्हा आरएसएससोबत काम करण्याचे ठरवले. आरएसएसच्यामार्फत ते पुढे भाजप पक्षासोबत जोडले गेले. त्यानंतर १९९४ मध्ये भाजपने पहिल्यांदा त्यांना गोवा विधानसभेच्या निवडणुकीत संधी दिली. या निवडणुकीत मनोहर पर्रिकर यांना यश मिळाले. परंतु, भाजपला या निवडणुकीत गोव्यामध्ये फार काही यश आले नव्हते. यावेळी त्यांनी गोवा विधानसभामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका निभावली होती.

भाजपचे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री

मनोहर पर्रिकरांमुळे गोव्यामध्ये भाजपचे ‘अच्छे दिन’ला सुरुवात झाली. गोव्यात भाजपचे प्रस्थ वाढण्यामागे पर्रिकर यांचे मोठे योगदान आहे. त्यातूनच २००० साली भाजपला गोवा विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले. यावेळी गोव्यात भाजप सत्तेत आले आणि मनोहर पर्रिकर भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले. दरम्यान, या कालावधीत त्यांच्या कौटुंबिक जीवनात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यांच्या पत्नी मेधा पर्रिकर कॅन्सरग्रस्त होत्या आणि या रोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही मुलांची संपूर्ण जबाबदारी पर्रिकर यांच्यावर पडली. यात काही घाडमोडी अशा घडल्या की, २७ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पुन्हा ५ फेब्रुवारी २००२ रोजी त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली गेली. २००५ साली भाजपला गोव्यात अपयश आले आणि पर्रिकर यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले.

२०१२ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री

२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला गोव्यात पुन्हा यश आले आणि मनोहर पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. २०१४ साली भाजपला देशात सर्वाधिक बहुमत मिळाले आणि त्यावेळी भाजपने मनोहर पर्रिकर यांना केंद्रिय संरक्षण मंत्री पद दिले. त्यामुळे पर्रिकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री पद सोडावे लागले आणि संरक्षण मंत्रीपदाचे सुत्रे त्यांनी हाती घेतली. २०१७ मध्ये गोव्याला पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नव्हते. मात्र विरोधी पक्षातील आमदारांनी पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले तर पाठिंबा देऊ, अशी अट ठेवली. त्यामुळे पर्रिकर यांना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावून पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री पद देण्यात आले होते.

First Published on: March 17, 2019 8:18 PM
Exit mobile version