न्यूझीलंडमधील मशिदीत गोळीबार; ४९ जणांचा मृत्यू

न्यूझीलंडमधील मशिदीत गोळीबार; ४९ जणांचा मृत्यू

न्यूझीलंडच्या मशिदीत गोळीबार

न्यूझीलंडच्या दक्षिण आयलंड शहरातील एका अल नूर मशिदीमध्ये झालेल्या गोळीबारातील मृतांचा आकडा वाढला असून नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार ४९ जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. 


न्यूझीलंडच्या दक्षिण आयलंड शहरातील एका अल नूर मस्जिदमध्ये अज्ञाताने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस पूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. अज्ञातानं केलेल्या या गोळीबारात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, क्रिकेट सामन्यांसाठी बांगलादेशातील खेळाडू न्यूझीलंडमध्ये असताना, आज सकाळी मशिदीत ते नमाजासाठी गेले होते. मात्र सुदैवाने ते या गोळीबारातून थोडक्यात बचावले आहेत. जखमींना ख्रिस्टचर्च हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यातील ३० रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

मशिद

दुसरे मशिद रिकामे केले

न्यूझीलंड पोलिसांच्या माहितीनुसार, क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे एक शूटर उपस्थित आहे. पोलीस त्याचा सामना करत आहेत. परंतु अद्याप या गोळीबारात किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिलेली नाही. सेंट्रल क्राइस्टचर्चच्या प्रशासनानं लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, मशिदीत ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा तिथे अनेक जण उपस्थित होते. तर शेजारी असलेल्या दुसऱ्या मशिदीला रिकामी करण्यात आलं आहे.

First Published on: March 15, 2019 9:00 AM
Exit mobile version