मॅकडोनाल्डच्या सीईओला कर्मचाऱ्यासोबतचे रिलेशनशीप भोवले!

मॅकडोनाल्डच्या सीईओला कर्मचाऱ्यासोबतचे रिलेशनशीप भोवले!

सह कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीपमध्ये राहणे मॅकडोनाल्डच्या सीईओला महाग पडले आहे. याप्रकरणी मॅकडोनाल्डचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची कंपनीने हकालपट्टी केली आहे. कंपनीच्या धोरणांच्या विरोधात स्टीव्ह यांनी कृत्य केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे कंपनीच्या मंडळाने सांगितले. दरम्यान ५२ वर्षीय स्टीव्ह ईस्टरब्रुक हे २०१५ पासून सीईओ पदावर काम करत होते. दरम्यान ईस्टरब्रुक यांच्यानंतर क्रिस केंपिजिन्स्की यांना मॅकडोनाल्ड यूएसएचे सीईओ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

नेहमी कंपनीच्या हिताचा विचार केला – स्टीव्ह

कर्मचाऱ्यासोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे स्टीव्ह यांनी काही चुकीचे निर्णय घेतल्याचा ठपका संचालकीय मंडळाने त्यांच्यावर ठेवला. त्यानंतर स्टीव्ह यांनी मंडळातील सदस्यपदाचा राजीनामा दिला. एवढेच नाही तर स्टीव्ह यांनी कर्मचाऱ्यांना इ-मेल केला. या इ-मेल मध्ये स्टीव्ह यांनी लिहिले की, “मी नेहमीच कंपनीच्या हितासाठीच काम केले आहे. तरीसुद्धा संचालकीय मंडळाचा निर्णय योग्य असून मी जाण्याची वेळ आली आहे.”

२०१५ मध्ये मॅकडीचे सीईओची जबाबदारी दिली

२०१५ मध्ये मॅकडोनाल्ड व्यावसायिक संघर्ष करत असताना स्टीव्ह यांच्याकडे सीईओ पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी कंपनीचे शेअर्ससुद्धा कोसळत होते. तसेच ग्राहकांची संख्यासुद्धा कमी झाली होती. पण स्टीव्ह यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याच्या आधारे कंपनीला उभारी मिळवून दिली.

First Published on: November 4, 2019 1:42 PM
Exit mobile version