#MeToo : ज्येष्ठ पत्रकार ‘विनोद दुआ’ यांच्यावरही आरोप

#MeToo : ज्येष्ठ पत्रकार ‘विनोद दुआ’ यांच्यावरही आरोप

फिल्ममेकर निष्ठा जैन यांचा ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवांवर आरोप

सध्या गाजत असलेल्या #Metoo मोहिमेअंतर्गत आता ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावरही लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपट निर्मात्या निष्ठा जैन या महिलेने ट्वीटर आणि फेसबुकच्या माध्यमातून विनोद दुआ यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. विनोद दुआ यांनी त्यांची मुलगी मल्लिका दुआ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्याविषयी नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट वाचल्यानंतर निष्ठा जैन विनोद दुआंवर आरोप करणारी पोस्ट केली आहे. विनोद दुआ यांनी २९ वर्षांपूर्वी आपल्यासोबत केलेलं असभ्य वर्तन सर्वांसमोर यावं, यासाठी मी बोलण्याचा निर्णय घेतल्याचं निष्ठा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे अन्य एका महिलेने बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहर यांच्यावर नुकताच लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. त्यामुळे आतापर्यंत बॉलीवूडपुरते मर्यादित असलेले #MeToo चे वादळ आता अन्य क्षेत्रात पसरताना दिसत आहे.


धक्कादायक: #MeToo चं वादळ बीसीसीआयमध्ये, ‘या’ अधिकाऱ्यावर आरोप

निष्ठा जैन यांचा आरोप काय?

निष्ठा जैन यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘१९८९ मध्ये म्हणजेच २९ वर्षांपूर्वी मी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. एकदा नोकरीच्या मुलाखतीसाठी मी ‘जनवाणी’ या चॅनेलमध्ये गेले होते. त्यावेळी विनोद दुआ माझा इंटरव्ह्यू घेणार होते. मुलाखतीसाठी मी त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर काही वेळातच त्यांनी अश्लिल विनोद करायला सुरुवात केली. मला त्यांचे ते विनोद आवडत नसल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी होती. त्यानंतर त्यांनी मला पगाराची अपेक्षा विचारली असता मी ५ हजार रुपये असं उत्तर दिलं. त्यावर ते खूप संतापले आणि ‘माझी लायकी आहे’? असा थेट प्रश्न विचारला. त्यांचा हा प्रश्न माझ्यासाठी अपमानास्पद होता आणि असा अपमान मी पहिल्यांदाच सहन केला.’

पोस्टमध्ये पुढे निष्ठा यांनी लिहीलंय, की ‘हे सगळं विसरुन मी दुसऱ्या कंपनीमध्ये व्हिडिओ एडिटर म्हणून रुजू झाले. मात्र, मी कुठे काम करते आहे हे शोधून काढून, दुआ यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांनी अनेकदा माझा पाठलाग केला. एकदा तर ते माझ्या ऑफिसजवळ मला भेटायला आले आणि त्यांच्या गाडीत बसण्यासाठी माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यावेळी कसाबसा तिथून पळ काढला. या विनोद दुआंनी काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारवर #MeToo प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी स्वत: एकदा भूतकाळात डोकावण्याची गरज आहे. दुसऱ्यावर कमेंट करण्याआधी आपलं स्वत:चं वर्तन त्यांनी पाहावं.’


Video: पाहा, आधुनिक काळातील ‘झाशीची राणी’

 

First Published on: October 14, 2018 4:10 PM
Exit mobile version