देशातील ८२ मेडिकल्स कॉलेज ब्लॅकलिस्टेड

देशातील ८२ मेडिकल्स कॉलेज ब्लॅकलिस्टेड

फोटो सौजन्य -डीएनए

मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव, प्राचार्यांची कमतरता या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे देशातील ८२ मेडिकल्स कॉलेजना चांगलेच महागात पडले आहे. यासर्व गोष्टी गांभीर्याने घेत मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने देशातल्या ८२ कॉलेजना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २०१८-१९ या शैक्षणित वर्षासाठी या ८२ कॉलेजवर कारवाई केली आहे.

का केली कारवाई?

मुलभूत सोयी -सुविधांचा अभाव असल्यामुळे कारवाई केल्याचे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. सोयी-सुविधांचा अभाव, प्राचार्यांची कमतरता हे ब्लॅकलिस्टेड करण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षासाठी देशातील मेडिकल विद्यालयांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये ८२ कॉलेजमध्ये पायाभूत सोयी – सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर मेडिकल कॉलेजवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कारवाई केलेल्या कॉलेजमध्ये ७० खासगी तर, १२ सरकारील कॉलेजांचा समावेश आहे. यंदा एमबीबीएसच्या ६४००० जागा उपलब्ध होत्या. पण ८२ कॉलेजवर कारवाई केल्यामुळे १० हजार जागा कमी झाल्या आहेत. ३१ सरकारी कॉलेज आणि ३७ खासगी नव्या कॉलेजना परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली होती. पण, ती फेटाळली गेल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांने दिली.

First Published on: June 8, 2018 2:34 AM
Exit mobile version