रक्तपात थांबवण्यासाठी सरकारने मार्ग काढावा – मेहबुबा मुफ्ती

रक्तपात थांबवण्यासाठी सरकारने मार्ग काढावा – मेहबुबा मुफ्ती

IND vs PAK : पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजर करणाऱ्या काश्मिरींवर राग का? मेहबुबा मुफ्तींचा सवाल

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे आज झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निंदा राजकीय पक्षाकडून केली जात आहे. हा दहशतवादी हल्ला मोठा असल्यामुळे देशाच्या सुरक्षीततेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे उमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी दुःख व्यक्त केले आहे. मुफ्ती यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या मुफ्ती

“अवंतिपुरा येथून एक धक्का दायक बातमी समोर आली आहे. एका हल्ल्यात आपले १२ जवान शहिद झाले आणि काही जवान जखमी झाले आहेत. या घटनेची निंदा शब्दात व्यक्त केली जाऊ शकत नाही. शेवटी किती लोकांचा बळी घेऊन हा वेडेपणा संपेल? रक्तपात थांबवण्यासाठी सरकारनेच मार्ग काढावा.” – मेहबुबा मुफ्ती

First Published on: February 14, 2019 7:12 PM
Exit mobile version