US Election 2020: पती डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर पत्नीचा सल्ला; म्हणाली…

US Election 2020: पती डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर पत्नीचा सल्ला; म्हणाली…

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे डेमोक्रेटिक पक्षाचे ज्यो बायडेन विजयी झाले. दरम्यान राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक उमेदवार ज्या बायडेन यांच्याकडून झालेला पराभव अद्याप डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता तरी ही झालेली हार मान्य करावी, असे अनेकांकडून सांगितले जात आहे. तर अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांना सुद्धा, पती ट्रम्प यांनी आता पराभव मान्य करावा, असे वाटते. त्यांनी आपल्या पतीला तसा सल्ला दिला आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, मेलेनिया ट्रम्प यांनी जाहीरपणे निवडणुकीवर भाष्य केलेले नाही. पण खासगीमध्ये मात्र त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची फेरनिवड व्हावी, यासाठी मेलेनिया ट्रम्प यांनी मागच्या महिन्यात प्रचारही केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि सल्लागार जेराड कुशनर यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.

डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप

अमेरिकेत मंगळवारी मतदान सुरू झाले. त्यानंतर या निवडणूकीची मतमोजणीची प्रक्रिया चार दिवस सुरू होती. त्यानंतर शनिवारी रात्री या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. पेनसिल्व्हेनिया राज्याने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाल्याने ते विजयी असल्याचे घोषित करण्यात आले. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणी सुरु असतानाच बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला. त्या विरोधात ते कोर्टातही गेले. दरम्यान पेनसिल्व्हेनिया या राज्यामुळे बायडेन यांना २७० पेक्षा अधिक इलेक्टोरल व्होटस मिळवता आले. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही उमेदवाराला २७० व्होटस मिळवणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.


दिवाळीपूर्वीच शेअर बाजारात आतषबाजी; सेन्सेक्स आणि निफ्टी सर्वोच्च स्तरावर

First Published on: November 9, 2020 12:00 PM
Exit mobile version