#MeToo : एम जे अकबर यांचा अखेर राजीनामा

#MeToo : एम जे अकबर यांचा अखेर राजीनामा

एम. जे. अकबर (फाईल फोटो)

सध्या देशभरात सुरु असलेल्या #MeToo मोहिमेअंतर्गत, केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी एम जे अकबर यांनी अखेर परराष्ट्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. प्रिया रमानी या महिला पत्रकाराने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. दरम्यान भारतात आल्यानंतर एम जे अकबर यांनी हे आरोप फेटाळले होते. मात्र, आरोप सिद्ध होईपर्यंत आता त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

‘मिंट’च्या माजी संपादिका प्रिया रामानी यांनी एम. जे. अकबर यांच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. रमानी यांनी #MeToo चळवळीच्या अंतर्गत लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर एकच खळबळ माजली होती. दरम्यान यावेळी नायजेरियाच्या दौऱ्यावर गेलेल्या एम. जे. अकबर यांनी भारतात परतल्यानंतर सर्व आरोप फेटाळून लावले होते. रमानी यांनी महिला पत्रकार-संपादिकेविरोधात मानहानीची याचिका देखील दाखल केली होती. मात्र, या आरोपांनतरही रराष्ट्र खाते किंवा केंद्र सरकारकडूनही कोणताही खुलासा करण्यात न आल्यामुळे अकबर यांच्याविरोधातील वातावरण अधिकच तापू लागले होते. त्यामुळे रामानी आणि इतर महिलांच्या आरोपांनंतर एम. जे. अकबर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव येऊ लागला होता. अकबर यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असले, तरी आरोप सिद्ध होईपर्यंत आता त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.


वाचा: ब्राम्होस क्षेपणास्त्राची माहिती लीक

First Published on: October 17, 2018 5:04 PM
Exit mobile version