#MeToo चं वादळ बीसीसीआयमध्ये, ‘या’ अधिकाऱ्यावर आरोप

#MeToo चं वादळ बीसीसीआयमध्ये, ‘या’ अधिकाऱ्यावर आरोप

बीसीसीआयने आयसीसीला सुनावले

सध्या देशभरात आणि विशेषत: बॉलीवूडमध्ये #Metoo चे वादळ वेगाने पसरते आहे. दरम्यान आता ‘बीसीसीआय’चे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सीईओ- राहुल जोहरी हे देखील #Metoo वादळाच्या कचाट्यात सापडले आहेत. एका महिलेने राहुल यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. आरोपकर्त्या महिलेने ट्वीटरच्या माध्यमातून BCCI पर्यंत ही माहिती पोहोचवली आहे. या आरोपानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने राहुल यांच्याकडून याविषयी स्पष्टीकरण मागवले असून, ते सादर करण्यासाठी त्यांना एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. महिलेने तिच्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, ‘राहुल जोहरी यांनी बीसीसीआयचे सीईओ होण्यापूर्वी, लैंगिक शोषण केले होते.’ दरम्यान राहुल यांनी स्पष्टीकरण सादर केल्यानंतर, या प्रकरणाची पुढील चौकशी केली जाणार असल्याचं समजतंय.


Video: आव्हाडांची मोदींवर ‘विंडबनात्मक’ कविता

सध्या #MeToo मुव्हमेंट भलताच जोर धरत असल्यामुळे, राहुल जोहरींचं प्रकरण सध्या सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये चांगलंच गाजतं आहे. त्यातही आतापर्यंत केवळ सिनेसृष्टीपुरतं मर्यादित असलेलं हे #MeToo प्रकरण, थेट बीसीसीआयपर्यंत पोहचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान ‘अज्ञात महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर राहुल जोहरी स्पष्टीकरण आल्यानंतर, पुढील कारवाईची दिशी निश्चीत केली जाईल’, असं स्पष्टीकरण शिस्तपालन समितीच्यावतीने देण्यात आलं आहे.


वाचा: पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज; रेड अॅम्ब्युलन्समधून गोव्यात दाखल

First Published on: October 14, 2018 3:40 PM
Exit mobile version