MeToo ‘भाजप नेत्यानं जबरदस्तीनं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला’

MeToo ‘भाजप नेत्यानं जबरदस्तीनं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला’

देशभरात सध्या #Mee Tooवरून अनेकांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली आता उत्तराखंडमधील भाजप नेते संजयकुमार यांची देखील भाजपनं हकालपट्टी केली आहे. याप्रकरणामध्ये पीडित महिलेनं संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय कुमार मला अश्लील छायाचित्र पाठवायचा तर काही वेळा त्यानं कार्यालयातच माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पीडित महिलेनं दिली आहे. संजय कुमारनं दोन वेळा माझं चुंबन देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मी वरिष्ठ भाजप नेत्यांकडे तक्रार देखील केली. पण, वरिष्ठांनी देखील माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं असं देखील पीडित महिलेनं म्हटलं आहे. त्यामुळे भाजप समोरच्या अडचणी वाढण्याचा शक्यता आहेत. सातच दिवसांपूर्वी भाजपनं संजय कुमार यांना पटावरून हटवले आहे. त्यांच्याकडे महासचिवपदाची जबाबदारी होती. पीडित महिला मुळची डेहरादूनची आहे. २००६ पासून ही महिला उत्तराखंडमध्ये राहते. पीडित महिला भाजप कार्यालयामध्ये डेटा एंट्रीचे काम करायचे. यावेळी संजय कुमार यांच्याशी ओळख झाल्याची माहिती पीडित महिलेनं दिली.

वाचा – #MeToo in BCCI: सौरव गांगुलीने बीसीसीआयला झापले

फेब्रुवारीमध्ये पक्षासाठी आलेल्या धनादेशाच्या डेटा एट्रीचे काम सुरू होते. त्यासाठी मी रोज कार्यालयामध्ये जात होती. यावेळी संजय कुमार माझ्याकडे पाहून शेरेबाजी करायचा. दोन वेळा तर त्यांना माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळा मला इंटरनेटवरून डाऊनलोड केलेले अश्लिल छायाचित्र मला पाठवले जायचे. केव्हा – केव्हा तर मला स्वत:चे फोटो देखील संजय कुमारनं पाठवले. पण, हे सारे फोटो अवघ्या काही मिनिटामध्ये डिलीट केले जायचे अशी माहिती देखील पीडित महिलेनं दिली आहे. ज्यावेळी मी कार्यालयामध्ये जाणं बंद केलं तेव्हा वरिष्ठांनी मला विचारणा केली. तेव्हा झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. पण, त्यांनी देखील पुरावा आहे का? अशी विचारणा केली.

वाचा – #MeToo बदल नाही फक्त गवगवा होतोय – मलायका अरोरा

त्यानंतर मी फोन रेकॉर्ड करायला सुरूवात केली. पुरावे गोळा केल्यानंतर मी संजय कुमार यांना हे सारे प्रकार थांबवा अन्यथा वरिष्ठांकडे जाईन असे सांगितले. पण, त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी संजय कुमार यांच्या समर्थकांनी माझा फोन काढून घेतला. पोलिसांनी देखील माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे.

पण, धारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पंत यांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. एकंदरीत या साऱ्या प्रकारनंतर भाजप समोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

वाचा – #MeToo: अहाना कुमरानेही केला साजीद खानवर आरोप

First Published on: November 16, 2018 10:06 AM
Exit mobile version