धक्कादायक! शिक्षिकेने चिमुकलीवर केला अनैसर्गिक अत्याचार; प्रियकराला पाठवला व्हिडिओ

धक्कादायक! शिक्षिकेने चिमुकलीवर केला अनैसर्गिक अत्याचार; प्रियकराला पाठवला व्हिडिओ

अत्याचार

मध्यप्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका खासगी शिकवणी घेणाऱ्या एका महिला शिक्षिकेने दोन चिमुकलींवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. गंभीरबाब म्हणजे या शिक्षिकेन अनैसर्गिक अत्याचार केलेल्याचा व्हिडिओ आपल्या प्रियकराला पाठवला आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षिका आणि तिच्या प्रियकराविरोधात पॉक्सो आणि अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

इंदौरजवळील महू या ठिकाणी एका खासगी शिकवणी घेणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने तिच्याकडे शिकायला येणाऱ्या दोन चिमुकलींवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही चिमुरड्या बहिणी असून त्या शिकण्यासाठी जात होत्या. दरम्यान, या शिकक्षिकेने एका सहा वर्षाच्या बहिणीबरोबर गेलेल्या लहान मुलीच्या गुप्तांगामध्ये या तरुणीने पेन्सील घुसवली. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन तिने आपल्या प्रियकराला पाठवला.

असा उघडकीस आला गुन्हा

दरम्यान, चिमुरडी घरी गेल्यानंतर काही तासांनी या मुलीने गुप्तांगाजवळ दुखत असल्याची तक्रार आपल्या आईकडे केली. त्यानंतर तिच्या आईने मुलीच्या गुप्तांगाची तपासणी केली असता. तिच्या गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. याप्रकरणी आईने चौकशी केली असता मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने मोठ्या मुलीकडे चौकशी केली असता बहिणीने सांगितलेली घटना खरी असल्याची कबुली दुसऱ्या बहिणीने दिली, अशी माहिती मुलीच्या आईने दिली आहे. ही घटना कळताच आईला धक्काच बसला. आईने घडलेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी शिक्षिकेचे घर गाठले. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या तरुणीने गुन्हा कबुल केला आहे. या तरुणीच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आढळून आला असून तिचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर तिच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात महू पोलीस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा – मोलकरणीने केली साडेनऊ लाखांची चोरी


 

First Published on: January 10, 2020 7:57 PM
Exit mobile version