अनंतनाग येथे दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

अनंतनाग येथे दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या सोपोर पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला;

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य केले आहे. सीआरपीएफ जवानांच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. तर दोन जवान आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जवानांच्या कॅम्पवर बेछूट गोळीबार

गोळीबारानंतर दहशतवादी फरार झाले. जवानांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी घटनास्थळावर घेराव घातला असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशताद्यांनी केलेल्या गोळीबारात उपनिरीक्षक मीना आणि कॉन्स्टेबल संदीप सिंह यादव गंभीर जखमी झाले. तसंच दोन जवान आणि एक स्थानक नागरिक जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान मीना आणि संदीप सिंह यादव यांचा मृत्यू झाला.

लष्कर-ए-तोएबाने घेतली जबाबदारी

दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संगठना लष्कर-ए-तोएबाने घेतली आहे. आमच्या संघटनेच्या मुलांनी हा हल्ला के असल्याचे लष्कर-ए-तोएबा संघटनेचे प्रवक्ता अब्दुल्ला गजनवीने सांगितले आहे. तर दुसरीकडे दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. काश्मीरच्या यारीपोरा पोलीस स्टेशनवर हल्ला केला या हल्ल्यात सुदैवाने काही नुकसान झाले नाही.

First Published on: July 13, 2018 6:31 PM
Exit mobile version