FAKENEWS : आरोग्य मंत्रालयानेच ट्विट करून वृत्त फेटाळले

FAKENEWS : आरोग्य मंत्रालयानेच ट्विट करून वृत्त फेटाळले

सीरम इंस्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लशीचा आपत्कालीन वापर हा फेटाळण्यात आल्याची बातमी एका वृत्तवाहिनीमार्फत चालविण्यात आली होती. पण ही माहिती खोटी असल्याचा अलर्ट केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केला आहे. ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून या फेक अलर्टची माहिती देण्यात आली आहे. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती ब्रेकिंग न्यूज म्हणून जाहीर केली होती. पण हा दावा फेटाळून लावत ही माहिती खोटी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एनडीटीव्ही न्यूज खोटी बातमी चालवत असल्याचे सांगतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही ट्विट केले आहे. आता ट्विटरवरही फेकन्यूज हा ट्रेंड सध्या टॉप ट्रेंडमध्ये आलेला आहे.

#FAKENEWS

The news running on @ndtvindia is Fake News. pic.twitter.com/VZv7uwW5z7

— Ministry of Health (@MoHFW_INDIA) December 9, 2020

आरोग्य मंत्रालयाच्या या ट्विटनंतर मात्र ट्विटर युजर्सने ट्विट्सचा पाऊस पाडला आहे. अनेक इतर वृत्तवाहिन्यांनीही याबाबतचे ट्विट केले असल्याची माहिती इंडिया टुडे, सीएनबीसी टीव्ही १९ यासारख्या वृत्तवाहिन्यांनीही दाखवली आहे. ट्विटर युजर्सने याबाबतचे स्क्रिनशॉट काढून अनेक ट्विट्स केल्या आहेत. ट्विटरवरही #fakenews हा अलर्ट यानिमित्ताने ट्रेंड होत आहे.


 

First Published on: December 9, 2020 7:09 PM
Exit mobile version