केंद्राने जारी केली अनलॉक-२ ची नियमावली

केंद्राने जारी केली अनलॉक-२ ची नियमावली

केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक -२ साठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात बर्‍याच कामांमध्ये सुट दिली जाणार आहे, तर कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक करण्याची तरतूद आहे. अनलॉक-१, ३० जून रोजी संपणार आहे. त्यामुळे, अनलॉक – २ ची घोषणा केली गेली आहे ज्यात अनेक कामांमध्ये निर्बंधांसह सुट असेल. कंटेनमेंट झोनमध्ये कडकपणा असेल तर कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात सूट दिली जाईल. नव्या मार्गदर्शक सूचना १ जुलैपासून लागू होणार आहेत.

सर्व टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे काम अनलॉक -१ मध्येच झालं. अनलॉक -२ मध्ये अजून क्षेत्रं उघडली जाणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी सल्लामसलत केल्यानंतर अनलॉक -२ मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. यात राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालय आणि त्यातील विभागांचा देखील समावेश आहे. अनलॉक -१ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स यांना ८ जूनपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर उघडण्याचे आदेश देण्यात आले होते. हे आदेश यापुढेही लागू असतील. यासाठी, मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) जारी केली गेली आहे.

अनलॉक -२ मधील महत्त्वाच्या गोष्टी

मर्यादित संख्येने स्थानिक उड्डाणे आणि प्रवासी गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. यापुढेही हे सुरुच असेल. रात्रीच्या कर्फ्यूची वेळ बदलली असून आता सकाळी १० ते पहाटे ५ अशी वेळ असेल. औद्योगिक युनिट्स, राष्ट्रीय आणि प्रादेशिक महामार्गांवर लोकांची हालचाल आणि माल वाहून नेणे, मालवाहतूकीची लोडींग आणि अनलोडिंग, बस, गाड्या, विमानाने आल्यानंतर लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी रात्रीच्या कर्फ्यूमध्ये सुट देण्यात आली आहे.

शाळा-महाविद्यालय बंद

दुकानांमध्ये ५ हून अधिक लोक एकत्र येऊ शकतात, परंतु यासाठी सोशल डिस्टंसिंगची काळजी घेण्याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था १५ जुलैपासून सुरू होणार आहेत. यासाठी एसओपी शासनाकडून देण्यात येणार आहे. वेगवेगळ्या राज्य सरकारांशी सल्लामसलत झाल्यानंतर ३१ जुलैपर्यंत शाळा-महाविद्यालये आणि कोचिंग संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

वंदे भारत मिशन अंतर्गत मर्यादित संख्येने आंतरराष्ट्रीय उड्डाणे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात आणखी वाढ करण्यात येईल. खालील गोष्टी वगळता सर्व गोष्टींना कंटेनमेंट झोनच्या बाहेर परवानगी असेल.

हे निर्णय राज्य सरकार घेतील

कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक केले जातील. कंटेनमेंट झोनची माहिती जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर देण्यात येईल. याबाबतची माहिती राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि आरोग्य मंत्रालय देखील पुरवितील. कंटेनमेंट झोनमधील कामांवर सरकारी अधिकारी बारीक लक्ष ठेवतील आणि त्यातील मार्गदर्शक सूचना पाळण्यावर भर देण्यात येईल. कंटेनमेंट झोनमधील नियमांचे पालन करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय कडक पहारा ठेवेल. कंटेनमेंट झोनच्या बाहेर कोणत्या उपक्रमांना सूट देण्यात येईल यावर राज्य सरकार निर्णय घेतील.


हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला संबोधणार


वृद्ध आणि लहान मुलांनी घरीच राहा

६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना, गंभीर आजाराने ग्रस्त, गर्भवती महिला आणि १० वर्षाखालील मुलांना बाहेर जाण्याची आवश्यकता नसल्यास घरातच रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्याशी संबंधित कामांसाठी सूट आहे. आरोग्य सेतु अॅप लोकांमध्ये वापरण्यास सरकार प्रोत्साहन देत राहील.

First Published on: June 30, 2020 12:07 AM
Exit mobile version