माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक, Elon Musk असा नावात केला बदल

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक, Elon Musk असा नावात केला बदल

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्वीट अकाऊंट हॅक, 𝐄ߋߊn ᛖʋsƙ असं केलं नाव बदल

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटशी छेडछाड केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘ग्रेट जॉब’, ‘समथिंग अमेझिंग’ सारख्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. हे ट्विट सातत्याने केले जात आहेत. तर अकाऊंटच्या नावातही हॅकर्सने बदल केला होता. यावेळी काही वेळ ‘इलॉन मस्क’ हे नाव अकाऊंटवर दिसत होते. मात्र हे अकाऊंट पून्हा रिस्टोर करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. तसेच हॅकर्सने केलेले ट्विटही हटवण्यात आल्याचे सांगितले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हॅकर्सकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. यावेळी मोदींच्या अकाऊंटवरूनही अशाच प्रकारचे ट्विट केले जात होते. यावर पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान मोदींचे अकाऊंट सुरक्षित करण्यात आले सांगितले. याचदरम्यान ICWA, IMA आदींचे ट्विटर अकाऊंटही हॅक झाले होते.

माहितीनुसार, पासवर्डशी छेडछाड केल्यामुळे किंवा malicious लिंकवर क्लिक केल्यामुळे हे घडले असावे असे म्हटले जाते. मात्र, मंत्रालयाने काही वेळातच अकाऊंट रिस्टोर केले. दरम्यान आता प्रोफाइल पिक्चर बदलण्यात आला असून हॅकर्सनी केलेले ट्विट काढून टाकले जात आहेत.

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्वीट अकाऊंट हॅक, 𝐄ߋߊn ᛖʋsƙ असं केलं नाव बदल

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाऊंटशी छेडछाड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची वैयक्तिक वेबसाइटही हॅकर्सने हॅक केली होती. यात बिटकॉइनचा प्रचार करणाऱ्या पोस्ट केल्या जात होत्या. क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनचा प्रचार करण्यासाठी हॅकर्सचे लक्ष्य मोदींच्या अकाऊंटवरच नाही तर यापूर्वी अमेरिकेचे माजी पंतप्रधान बराक ओबामा, बिल गेट्स यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे ट्विटर हँडल हॅक केले होते.


Corona cases in India : देशात कोरोनाचा उद्रेक सुरुच; बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या तिप्पट


First Published on: January 12, 2022 11:18 AM
Exit mobile version