राजधानीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये मुलींच्या सुरक्षिततेच्या मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुसरीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने राजधानी पुन्हा एकदा हादरून गेली आहे. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बलात्कार प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला नराधम हा व्यवसायाने इलेक्ट्रिशन आहे. पीडित अल्पवयीन ही सरकारी शाळेत शिकत असून ती घरी परतत असताना नराधमाननं आपला डाव साधला. ८ ऑगस्ट रोजी पीडित शाळेतून घरी परतत होती. यावेळी नराधमानं जवळच्या पंप स्टेशनमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या घरच्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी २४ तासांच्या आत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. लवकरच नराधमाला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पीडितेच्या घरची परिस्थिती देखील हालाखीची आहे.

वाचा – दिल्लीमध्ये ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

राजधानीत बलात्काराच्या वाढत्या घटना

राजधानी दिल्लीमध्ये महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता देशभरातून विचारला जात आहे. दिल्लीमध्ये बलात्कारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या वाढत्या बलात्काराच्या घटना पाहता महिला सुरक्षेसाठी सरकार आता काय पावलं उचलणार? असा सवाल देशाभरातून विचारला जात आहे. २०१२ साली झाालेल्या निर्भया प्रकरणानंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. यावेळी नराधमांना फाशीची मागणी जोर धरू लागली होती. लोकांनी रस्त्यांवर उतरून कायदा आणखी कठोर करा अशी मागणी केली होती. पण त्यानंतर देखील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. परिणामी आता दिल्लीकर या सर्व प्रकरणामध्ये काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. शिवाय, आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही का? असा सवाल देखील विचारला जात आहे.

वाचा – अल्पवयीन मुलीवर पोलीस, बिल्डर आणि राजकारण्याचा बलात्कार

वाचा – निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी की जन्मठेप? पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी

First Published on: August 10, 2018 12:31 PM
Exit mobile version