भयंकर, ८ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार नंतर हत्या, डोळे फोडले, बोटंही ठेचली

देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत एका ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बिहारमध्ये एका ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. नंतर तिचे डोळे फोडण्यात आले व बोटंही दगडाने ठेचण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

बिहारमधील मुंगेर गावात मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. तिचे वडील मच्छीमार आहेत. बुधवारी ती वडिलांबरोबर गंगेच्या घाटावर आली होती. पण नंतर वडिलांनी तिला घरी जाण्यास सांगितले व ते मासेमारीसाठी निघून गेले. पण बराच वेळ उलटला तरी मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तिचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार केली. त्यानंतर गुरुवारी गावातील एका निर्जनस्थळी झाडाखाली तिचा नग्नावस्थेतील मृतदेह सापडला. बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे डोळे फोडून बोटंही दगडाने ठेचण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण बिहारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

First Published on: August 6, 2021 4:01 PM
Exit mobile version