मिनाक्षी चौधरी ठरली ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८’ ची फर्स्ट रनर अप

मिनाक्षी चौधरी ठरली ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८’ ची फर्स्ट रनर अप

मिनाक्षी चौधरी (सौजन्य-इंस्टाग्राम)

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लावण्यात आला आहे. ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८’ या सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी मिस इंडिया मिनाक्षी चौधरी ही पहिली रनर अप ठरली आहे. तर पेराग्वेची क्लारा सोसा हिने ‘मिस इंटरनॅशनल २०१८’ चा किताब पटकावला आहे. यंदाचा हा सोहळा म्यानमारमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सौंदर्य स्पर्धेचा उद्देश जगभरात शांतता प्रस्तापित करणे हा आहे.

प्रत्येक टप्प्यात मिनाक्षी सरर ठरली 

या कार्यक्रमाची सुरुवात २०१७ मधील सर्व स्पर्धकांच्या नृत्याने करण्यात आली. यावेळी सर्वानी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. कार्यक्रमातील सूत्रसंचालकाने प्रथम मिस ग्रँड पेरू २०१८ एंड्रिया मोबर्गला विजेता म्हणून घोषित केले. त्यानंतर अंतिम स्पर्धेसाठी स्पर्धक व्यासपीठावर आले. यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी मिनाक्षी चौधरीदेखील टॉप २० मध्ये होती. दुसऱ्या टप्प्यात सर्व स्पर्धक स्विमसूटमध्ये आल्या. यानंतर १० स्पर्धकांचीच निवड पुढील राउंडसाठी करण्यात आली. यामध्ये मिस इंडिया मिनाक्षी चौधरी, मिस डोमिनिक रिपब्लिक, मिस पेराग्वे, मिस मेक्सिके, मिस व्हेनेज्युएला, मिस प्यूर्टो रिको, मिस इंडोनेशिया, मिस जपान आणि मिस व्हियतनाम यांचा समावेश होता. त्यानंतर टॉप ५ आणि अखेर फर्स्ट रनर अप म्हणून मिनाक्षीची निवड झाली.

First Published on: October 26, 2018 11:53 AM
Exit mobile version