Mizroam Election 2018: १० वर्षांनंतर सत्तापालट, मिझो नॅशनल फ्रंट विजयी!

Mizroam Election 2018: १० वर्षांनंतर सत्तापालट, मिझो नॅशनल फ्रंट विजयी!

मिझोराम विधानसभा निवडणूक २०१८

मिझोराम विधानसभा निवडणुकीचा निकाल
मिझो नॅशनल फ्रंट-  २६

काँग्रेस- ५

भाजप- ०१

इतर- ०८

 

मिझो फ्रंटला बहुमत

मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचा विजय झाला आहे. मिझो नॅशनल फ्रंटचे सर्वाधिक असे २६ उमेदवारांचा विजय झालेला आहे. तर काँग्रेसचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचबरोबर भाजपने १ जागा जिंकली आहे. तर इतर ९ जागांवर निवडून आले आहेत.

मिझो फ्रंटच्या कार्यालयाबाहेर जल्लोष


मुख्यमंत्री हरले 

मिजोरामचे मुख्यमंत्री लल थनहवला चम्फाई यांचा पराजय झाला आहे. त्यांच्याविरोधात उभे असलेले मिझो नॅशनल फ्रंटचे टीजे ललनुंत्लुअंगा विजयी झाले आहेत.


मिझोराम विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण ४० जागांसाठी ही लढत होणार आहे. मिझोराममध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ४० पैकी ३० जागांवर काँग्रेस निवडून आली होती. २८ नोव्हेंबर रोजी मिझोराममध्ये मतदान झाले होते.  बहुमतासाठी २१ जागांची आवश्यकता आहे.

५ राज्यांचे लाईव्ह अपडेट्स

१० वर्षे काँग्रेसची सत्ता 

मिझोराममध्ये गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. ईशान्य भारतात असणारे हे राज्य काँग्रेसच्या ताब्यात असलेले एकमेव राज्य आहे. त्यामुळे भाजपला या ठिकाणी सत्ता मिळवणे थोडे कठीण जाणार आहे. मिझोराममधील ही लढत काँग्रेस विरुद्ध मिझो नॅशनल फ्रंट अशी असणार आहे. भाजपला संधी मिळाली तर मिझो नॅशनल फ्रंटशी युती करुन सत्तेत सहभागी होऊन ईशान्य भारताला काँग्रेसमुक्त करण्यासाठीची ही लढत आहे.


मिझोराम वेगळे राज्य

साक्षरतेच्या बाबतीत केरळची बरोबरी करणारे मिझोराम हे राज्य आहे. महिला साक्षरतेत हे राज्य अव्वल आहे. या बाबतीत त्याने केरळलाही मागे टाकले आहे. मिझोराममध्ये अनेक जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धती अद्यापही अस्तित्वात आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत मिझोराम हे वेगळे आहे.


भाजपशी युती करण्यास नकार 

भाजपला या ठिकाणी सत्ता स्थापन करणे कठीण आहे कारण, ईशान्येतील ६ राज्ये जरी भाजपकडे असली तरी भाजपला मिझोराममध्ये युतीसाठी एकही पक्ष मिळालेला नाही. सर्व स्थानिक पक्षांनी भाजपशी युती नाकारली होती. या ठिकाणी त्रिशंकू स्थिती झाल्यास निवडणुकांनंतर भाजप स्थानिकपक्षांना सोबत घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही

 

 

 

 

 

First Published on: December 11, 2018 8:36 AM
Exit mobile version