झारखंड मॉब लिंचिंग: बकरीच्या चोरीवरून दोन तरुणांना मारहाण; एकाचा मृत्यू

झारखंड मॉब लिंचिंग: बकरीच्या चोरीवरून दोन तरुणांना मारहाण; एकाचा मृत्यू

झारखंडमधील दुमका जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात मॉब लिंचिंगचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. येथील काठीकुंड परिसरात झिलीमिली गावात बकरी चोरीच्या आरोपाखाली जमावाने दोन तरुणांना बेदम मारल्याची घटना घडली आहे. त्या दोघांमधील एकाचा या मारहाणीत मृत्यू झाल्याचे समजते. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या तरुणावर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – एअर इंडियाचं विमान मलेशियातील १८० भारतीयांसह चेन्नईत दाखल

काय आहे प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ही घटना घडली. शिकारीपाडामधील द्वारपहाडी गावात २६ वर्षीय सुभान मिया आणि ढाका गावातील २२ वर्षीय दुलाल मिर्धा एक किमीच्या अंतरावर असलेल्या काठीकुंडच्या झिलीमिली गावात गेले होते. मात्र स्थानिक गावकऱ्यांनी त्यांच्यावर एकाची बकरी उचलून घेऊन गेल्याचा आरोप लावला. गावाबाहेर हे दोघं एका बकरीला कापत होते. तिथून जाणाऱ्या गावकऱ्यांनी ते पाहिले. त्यांनी त्या दोन तरुणांना घेरले आणि बकरी चोर म्हणत त्यांच्या हल्ला चढवला. गोंधळ ऐकून तिथे लोकं जमायला लागली. या गर्दीने बकरी चोरीचा आरोप लावत त्या दोन तरुणांना बेदम मारले. या घटनेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसऱ्या गंभीर इजा झाली आहे.

पोलीस अधिक्षक अंबर लकडा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकल्या आहेत. एका बाजूला हत्येची तर दुसऱ्या बाजूला बकरीच्या चोरीची तक्रार पोलिसांनी नोंदवली आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

First Published on: May 12, 2020 10:35 AM
Exit mobile version