मोदी २.० मध्ये निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्रालय; तर अरविंद सावंतांना अवजड उद्योग मंत्रालय

मोदी २.० मध्ये निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्रालय; तर अरविंद सावंतांना अवजड उद्योग मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा देशाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या सरकारमधील मंत्रीमंडळात कोणत्या नेत्याची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर त्यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांची नावं काल, गुरुवारी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात समजली. मात्र कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते असणार यावरील चर्चा सुरु राहिल्या. या संदर्भातील एक यादी जाहीर झाली असून यामध्ये काही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार भाजप अध्यक्ष राहिलेले नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांना मंत्रीमंडळात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. अमित शहा यांना गृह मंत्रालय देण्यात आले आहे. तर राजनाथ सिंग यांना संरक्षण मंत्रालय दिले आहे. तसेच निर्मला सीतारमन यांना अर्थ मंत्रालय देण्यात आलं आहे. शिवाय मुंबई खासदार अरविंद सावंत पहिल्यांदा केंद्रात मंत्रीमंडळात सामील झाले असून त्यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात दुसऱ्यांना स्थापन झालेल्या भाजपा सरकारमध्ये कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र त्यात फारसे काही बदल न करता मागील सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या जबाबदाऱ्या कायम ठेवण्यात आल्या आहेत.

ही आहेत मंत्र्यांना मिळालेली खाती – 

First Published on: May 31, 2019 11:11 AM
Exit mobile version