‘मोदी हेच संपूर्ण जगाचे एकमेव आशास्थान’ ही तर ‘फेक न्यूज’- न्यूयॉर्क टाईम्सचा खुलासा

अमेरिकेचे नामांकित वृत्तपत्र असलेल्या न्यूयॉर्क टाईम्सने टि्वटर हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एका फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबरच एक पत्रकही प्रसिद्ध केले असून त्यात न्यूयॉर्क टाईम्सच्या हवाल्याने सोशल मिडियावर व्हायरल होत असलेली मोदी हेच संपूर्ण जगाचे एकमेव आशास्थान ही बातमी बोगस असल्याचं स्पष्ट केलं आहे.

न्यूयॉर्क टाईम्सच्या या पत्रकात मोदींबाबत आमच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटो व बातम्यांशी आमचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच मोदींबाबतच्या अधिकृत बातम्या वाचण्यासाठी न्यूयॉर्क टाईम्सने एक लिंकही या पत्रकात शेअर केली आहे.

न्यूयॉर्क टाईमन्सच्या नावाने काही दिवसांपासून एक फोटो व चार ओळींची बातमी मोठ्या प्रमाणात जगभरात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात मोदी हेच संपूर्ण जगाचे एकमेव आशास्थान असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. या फोटोमुळे न्यूर्यॉर्क टाईम्सवर अनेकांनी प्रश्नांचा भडीमार केला . तर काहीजणांनी त्यांना ट्रोलही केले आहे.

यामुळे न्यूयॉर्क टाईम्सला खुलासा पत्रक प्रसिद्ध करावे लागले आहे. तसेच यावरून अनेकांनी मोदी समर्थकांवर निशाणा साधला आहे. हे उद्योग मोदी समर्थकांचेच असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. फोटो शॉप करून मोदींचा फोटो व्हायरल करण्यात आला. असेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तर एका माजी आयएएस अधिकाऱ्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या ९ महिन्यांच्या कार्यकाळात १४० वेळा पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पण गेल्या ७ वर्षात मोदी एकदाही पत्रकारांसमोर आले नाहीत. उलट त्यांनी तर म्हणे बायडेन यांनाही मिडियाशी न बोलण्याचा सल्ला दिल्याचे कळते. असं म्हणत थेट मोदींनाच लक्ष्य केलं आहे.

 

 

 

 

 

First Published on: September 30, 2021 8:03 PM
Exit mobile version