मोदींची लोकप्रियता वाढली ट्विटरवर ६ कोटी फॉलोअर्स

मोदींची लोकप्रियता वाढली ट्विटरवर ६ कोटी फॉलोअर्स

मोदींची लोकप्रियता वाढली ट्विटरवर ६ कोटी फॉलोअर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचे दिसते. नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवरअकाउंट ओपन केले होते. ते ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणार्‍या नेत्यांच्या यादीत आहेत.

आता त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या तब्बल 60 दशलक्षच्या पुढे गेली आहे. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतासह संपूर्ण जगात 6 कोटींहून अधिक लोक ट्विटरवर फॉलो करतात. तर मोदी स्वतः 2,354 लोकांना फॉलो करतात.सप्टेंबर 2019 पर्यंत पंतप्रधान मोदींना ट्विटरवर एकूण 5 कोटी लोक फॉलो करत होते. ते आता वाढून 6 कोटी झाले आहेत. याचा अर्थ केवळ 10 महिन्यांतच त्यांना तब्बल 1 कोटी लोकांनी ट्विटरवर फॉलो केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटरवर 2 कोटी 16 लाख एवढे फॉलोअर्स आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 1 कोटी पाच लाख लोक ट्विटरवर फॉलो करतात.

First Published on: July 19, 2020 11:59 PM
Exit mobile version