केंद्र सरकारचं रिमोट कंट्रोल आरएसएसच्या हातात ?, मोहन भागवतांनी दिलं स्पष्टीकरण

केंद्र सरकारचं रिमोट कंट्रोल आरएसएसच्या हातात ?, मोहन भागवतांनी दिलं स्पष्टीकरण

Mohan Bhagwat

केंद्र सरकारवर आरएसएसचं रिमोट कंट्रोल असल्याची चर्चा नेहमीच असते. परंतु सरसंघचालक मोहन भागवत यांनी या चर्चेला पूर्णविराम देत केंद्र सरकारवर संघाचा रिमोट कंट्रोल नाही, असं स्पष्टीकरण मोहन भागवत यांनी दिलं आहे. मोहन भागवत हे हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत आहेत. येथील ठिकाणी त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी केंद्र सरकारचं रिमोट आरएसएसच्या हातात असल्याचं मीडियाकडून सांगितलं जातंय. पण त्यात काहीही तथ्य नाहीये. असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

सरकार आमच्या स्वयंसेवकांना कोणतच आश्वासन देत नाही. त्यामुळे आमच्याकडे जे काही आहे. ते आम्ही गमावू शकतो. गेल्या ४०हजार वर्षांपासून भारतातील लोकांचा डीएनए एकच आहे. परंतु आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलंय आणि त्यागही केला आहे. त्यामुळे आपली संस्कृती आजही जिवंत असल्याचं भागवत यांनी सांगितलं.

पुढे म्हणाले की, आपल्या परंपरेत पूर्वी एक खाढा घेतला जात होता. परंतु आता सर्व जग हे भारतीय मॉडलच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे आपला देश जागतिक महासत्ता बनला नाही तरी विश्व गुरू नक्कीच बनू शकतो. असंही त्यांनी सांगितलं आहे.

तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेल्या देशाचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच मोहन भागवत हे हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आले असून तिबेटी धर्म गुरू दलाई लामांना भेटण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : Covishield Vaccine : कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांमध्ये आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज


 

First Published on: December 19, 2021 5:09 PM
Exit mobile version