Mohan Bhagwat : रोज एका मशिदीमध्ये शिवलिंग का बघायचं? ज्ञानवापीवरुन मोहन भागवतांचे वक्तव्य

Mohan Bhagwat : रोज एका मशिदीमध्ये शिवलिंग का बघायचं? ज्ञानवापीवरुन मोहन भागवतांचे वक्तव्य

Mohan Bhagwat

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ (RSS) के प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की, भारताना विश्वविजेता बनायचे नाही आहे. भारताचा हेतू सर्वांना एकत्रित जोडण्याचा असला पाहिजे. भारत कुणाला जिंकण्यासाठी नसून सर्वांना एकत्र आणण्यासाठी अस्तित्वात आहे. ज्ञानवापीचा इतिहास आपण बदलू शकत नाही. आताच्या हिंदू-मुस्लिमांनी ते बनवले नाही. आपण रोज मशिदीमध्ये जाऊन शिवलिंग का पाहायचे? भांडण का करत बसायचे? तीसुद्धा एक पूजा असून ती त्यांनी स्वीकारली आहे असे मोहन भागवत म्हणाले आहेत.

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ (RSS) के प्रमुख मोहन भागवत यांनी ज्ञानवापीवरुन भाष्य केलं आहे. हिंदू हे मुस्लिमांच्या विरोधात नाहीत. रोज मंदिराचा मुद्दा काढणं योग्य नाही. ज्ञानवापीचा इतिहास आपण बदलू शकत नाही. काही मुस्लिम आक्रमनकारी आले आणि त्यांनी मंदिरं तोडली. यामुळेच काही हिंदू लोकांना वाटते की, मंदिर व्हायला पाहिजे.

प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग का निघत आहे. आपले पूर्वज समान आहेत. आता आपले शत्रू-मित्रा भाव आपल्यासाठीसुद्धा समान आहेत. एक दुसऱ्याच्या भावनांचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मुस्लिमांनीसुद्धा भारताला आपली मातृभूमी समजावी तसेच प्रत्येकाने आपलंच खरं असा अहंकार करणं योग्य नाही. आपापसात भांडण होऊ नये. एकमेकांवर प्रेम हवे. विविधतेकडे वेगळेपणा म्हणून पाहिले जाऊ नये. आपण एकमेकांच्या दु:खात सहभागी झाले पाहिजे. विविधता ही एकतेची शोभा आहे, विभक्तीची नाही असे मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

ज्ञानवापीसाठी रस्त्यावर उतरणार नाही

मोहन भागवत म्हणाले की, ज्ञानवापीचा मुद्दा सुरु आहे. परंतु आपण इतिहास बदलू शकत नाही. ते नाही हिंदूंनी आणि मुस्लिमांनी बनवलं नाही. हल्ल्यात देवस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली. बाहेरील हल्लेखोरांनी हे केले कारण ज्यांना भारताचे स्वातंत्र्य हवे होते त्यांचे मनोधैर्य खचले होते. हिंदू आणि मुस्लिम याचिकाकर्ते हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत की नाही हे तपासण्यासाठी कोर्टाने दिलेल्या मशिदीच्या संकुलाच्या चित्रीकरणावर कायदेशीर लढाई लढत आहेत. परंतु आपण रस्त्यावर ज्ञानवापीसाठी उतरणार नाही.


हेही वाचा : Caste Census: बिहारमध्ये हिंदू, मुस्लिम धर्मियांची जाती आधारित जनगणना होणार

First Published on: June 2, 2022 10:46 PM
Exit mobile version