कोरोनाची दहशत! परदेशातून येणाऱ्यांसाठी ‘या’ नव्या गाईडलाईन्स

कोरोनाची दहशत! परदेशातून येणाऱ्यांसाठी ‘या’ नव्या गाईडलाईन्स

चीन, अमेरिकासह अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होतेय. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात एक लेखी निवेदन जारी केल्या आहेत.

केंद्राने जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्स चीनसह ज्या देशांमध्ये सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी लागून करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता परदेशातून भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांना आता पुन्हा एअर सुविधा फॉर्म भरण अनिवार्य असणार आहे. या फॉर्ममध्ये 72 तास आधी केलेली आरटीपीसीआर चाचणीची माहिती देणं आवश्यक आहे.

दरम्यान 24 डिसेंबरपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळातून येणाऱ्या काही प्रवाशांची रँडमली कोविड चाचणी केली जाईल, केंद्राच्या माहितीनुसार, संबंधित विमानात येणाऱ्या कोणाचीही चाचणीसाठी निवडल केली जाईल, प्रत्येक फ्लाईटमधील किमान 2 टक्के लोकांची यात चाचणी होईल. सँपल दिल्यानंतर या प्रवाशांना विमानतळावरून सोडण्यात येईल. जर यातील एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्यांच्या रक्ताचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येईल.

चीन, अमेरिका, जपानसह इतर काही देशांमध्ये अचानक कोरोना संसर्ग वाढतोय. यापार्श्वभूमीवर देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली, यामध्ये राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना स्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे.


बुस्टर डोस न घेतल्यामुळे होतोय कोरोना संसर्ग? पालिकेने केले हे आवाहन

First Published on: December 23, 2022 10:37 AM
Exit mobile version