दिल्लीत माकडांनाही गारेगार मेट्रोची हौस

दिल्लीत माकडांनाही गारेगार मेट्रोची हौस

दिल्ली मेट्रोमधून माकडांचा प्रवास

दिल्ली मेट्रोमधून चार चक्क चार माकडांनी प्रवास केल्याची घटना घडली आहे. दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईन मेट्रो स्टेशनवर मंगळवारी सकाळी पावणे सात वाजता माकडांनी मेट्रो प्रवास केला. अचानक माकडांनी मेट्रोमध्ये प्रवेश केल्यामध्ये प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. मेट्रोमध्ये या माकडांनी इथे तिथे उड्या मारल्या, महिला प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली. या माकडांच्या भितीमुळे काही प्रवास्यांनी मेट्रोमधून उतरणे पसंद केले. तर काही प्रवासी माकडांच्या समोच चुपचाप बसून राहिले. सहा मिनिटानंतर ओखला बर्ड सेंचुरी स्टेशन आले तेव्हा एका पाठोपाठ एक माकड मेट्रोमधून उतरले.

माकडांमुळे प्रवाशांमध्ये भिती

प्रत्यक्षदर्शिने सांगितले की, मजेंटा लाईन मेट्रो स्टेशनवर मेट्रोमध्ये चढलेल्या या चारही माकडांनी प्रवाशांना काही हानी पोहचवली नाही. मेट्रोमध्ये हे माकडं इकडे तितडे बिनधास्त फिरत होते. पूर्ण वेळ ही माकडं या सीटवरुन त्या सीटवर उड्या मारत राहिले. माकडांच्या येण्यामुळे प्रवाशांमध्ये भीती होती. मेट्रोमध्ये माकड असल्यामुळे अनेक प्रवासी मेट्रोमध्ये चढलेच नाही. त्यामुळे मेट्रोमध्ये कमी गर्दी होती. ओखला बर्ड सेंचुरी मेट्रो स्टेशनवर ही सर्व माकडं उतरल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पहिल्यांदाच असे झाले

माकड मेट्रोमध्ये येण्याची पहिल्यांदाच घटना घडली आहे. याआधी जानेवारी २०१८ मध्ये एक माकड मेट्रो स्टेशनवर आले होते. त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यावेळेला देखिल या माकडाने कोणाला काही नुकसान पोहचवले नव्हते. डीएमआरसीकडून अद्याप यासंदर्भात काहीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

First Published on: October 24, 2018 8:07 PM
Exit mobile version