देशात मान्सून सक्रिय , महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी

देशात मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्रासह ,दिल्ली,राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि केरळात जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज तर दिल्लीसाठी मंगळवारी यलो आणि बुधवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

तर मुंबई, पुणे , ठाणे आणि नाशिकमध्ये सोमवारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली असून अनेक भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबईच्या पूर्व उपनगरात ५८.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर पश्चिम उपनगरामध्ये ७८.६९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आज मंगळवारी सकाळीही पावसाने मुंबईसह आजूबाजूच्या परिसराला अक्षरश झोडपून काढले आहे. रेल्वे,रस्त्यांवर पाणी साचल्याने मुंबईच्या तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवेचे वेळापत्रक आज कोलमडले. तसेच रस्त्यांवरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने अनेक मुंबईकर आज वाहतूक कोंडीत अडकल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील पावसाची स्थिती आणि हवामान खात्याने दिलेला अलर्ट पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला अलर्ट राहण्याचा इशारा दिला असून कोकण , रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असल्याने शहरात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

तर दुसरीकडे येत्या पाच दिवसात महाराष्ट्रासह ओरिसा आणि त्याला लागून असलेल्या समुद्रतटजवळील दक्षिण झारखंड आणि पश्चिम बंगालवर कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झाला आहे., यामुळे महाराष्ट्रासह, मध्य भारत, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच देशात सर्व राज्यांमध्ये एकाचवेळी मान्सून सक्रिय होण्याची ही पहीलीच वेळ आहे.

 

 

First Published on: July 5, 2022 5:35 PM
Exit mobile version