उंदराच्या बिळात पाणी ओतले आणि…

उंदराच्या बिळात पाणी ओतले आणि…

..

उंदराच्या बिळात लहान मुलांची खेळण्याची गोळी गेली. त्यामुळे या लहान मुलांनी त्या बिळामध्ये पाणी ओतले. पाणी आत जाताच जे काही घडले त्यामुळे संपूर्ण गाव हादरुन गेले. लहान मुलांची गोळी त्या बिळात गेल्याने मुलांनी त्याठिकाणी पाणी ओताच त्या बिळातून उंदीर न येता. चक्क २०० साप बाहेर येऊन रेंगाळू लागले. ते दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपुर जिल्ह्यामध्ये घडली आहे.

नेमके काय घडले?

गोरखपुरमधील खोराबार ठाणे परिसरातील बसडीला गावामध्ये लहान मुले खेळत होती. त्यावेळी त्यांची खेळण्यातील एक गोळी उंदरांच्या बिळात गेली. त्या गोळीला बाहेर काढण्यासाठी मुलांनी बिळात पाणी ओतले. त्याचवेळी तब्बल २०० साप बाहेर आले. यामध्ये धामण, कोबरा यांचा समावेश होता. अचानक बाहेर आलेल्या सापांना गावकऱ्यांनी मारले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या पथकाने अडीच ते तीन फुटांखालील जमीन खोदून लपलेल्या सापांना बाहेर काढले.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार; गावात राजमंगल नावाचे एक जुने घर शेतामध्ये आहे. त्याच घरातून हे साप बाहेर पडत असल्याचे बोले जात आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ देखील काढण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, डीएफओ आशुतोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सापांवर हल्ला केला आहे. तसेच काही सापांना वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा – रस्त्याच्या कामावरून वाद; सपा नेता व मुलाची गोळी झाडून हत्या


 

First Published on: May 19, 2020 7:27 PM
Exit mobile version