MPमध्ये ९०० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण, याचा कोरोनाशी काही संबंध आहे का?

MPमध्ये ९०० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण, याचा कोरोनाशी काही संबंध आहे का?

देश कोरोनाशी दोन हात करत असताना डेंग्यू (dengue) सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. देशातील अनेक राज्यांना डेंग्यू आजाराने थैमान घातले. मध्य प्रदेशात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्य प्रदेशमध्ये ९०० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण समोर आले आहेत. (More than 900 dengue patients in Madhya pradesh)  एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी आधी कोरोना लागण झाली आहे किंवा दोन वर्षांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती त्यांना याचा अधिक धोका आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत त्याचप्रमाणे ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांना देखील याचा मोठा धोका उद्भवू शकतो, असा दावा केला आहे. डेंग्यूचा आणि कोरोनाशी काही संबंध आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

डेंग्यूची लागण कशी होते?

डेंग्यू हा आजाराची लागण डास चावल्याने होते. त्याचप्रमाणे साचलेल्या पाण्यात देखील मच्छर तयार होतात. कूलर,टायर,झाडांच्या कुंड्या, घरांच्या छपरावर साचणाऱ्या पाण्यांमुळे देखील डेंग्यूचे डास तयार होतात. महिला आणि लहान मुलांना डेंग्यूची लागण जलद गतीने होते.

डेंग्यूचे कोरोनाशी काय कनेक्शन?

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांना डेंग्यूची लागण होत आहे. मात्र याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाही. यावर अभ्यास होणे बाकी आहे. मात्र कोरोना संक्रमित होणाऱ्यांना डेंग्यूचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांची परिस्थिती फार गंभीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाने पीडित असलेल्या रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर त्यांचे अवयव निकामी होण्याचा धोका वाढत आहे. डेंग्यूने पिडीत असलेल्या रुग्णांना कोरोनाशी लढण्यासाठी लागणाऱ्या एंटीबॉडीज तयार होत आहेत.

डेंग्यूचा प्रभाव किती दिवस राहतो?

डेंग्यूचा प्रभाव सामान्यत: दोन ते सात दिवसांपर्यंत राहतो. मांसपेशी आणि सांधे दुखीसोबतच ताप येतो. त्याचप्रमाणे डोळे दुखणे,सर्दी,ताप,उलटी होणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. तसेच डेंग्यूमुळे शरीरावर चट्टे देखील उठतात. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.


हेही वाचा – Covid-19 नंतर Covid-22 चा धोका, डेल्टा व्हेरिएंटपेक्षा खतरनाक असल्याचा वैज्ञानिकांचा इशारा

First Published on: August 25, 2021 6:27 PM
Exit mobile version