Zoom Call दरम्यान ९०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरीवरून हकालपट्टी, नेमक कारण काय?

Zoom Call दरम्यान ९०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरीवरून हकालपट्टी, नेमक कारण काय?

Zoom Call दरम्यान ९०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरीवरून हकालपट्टी, नेमक कारण काय?

एका कंपनीच्या सीईओने चक्क Zoom Call दरम्यान ९०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरीवरून हकालपट्टी केल्याची एक घटना समोर आली आहे. अमेरिका स्थित एका कंपनीच्या सीईओने हा निर्णय घेतला आहे. एकाच वेळी इतक्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची आश्चर्यकारक घटना आत्ता अनेकांसाठी चर्चेचा विषय बनतेय.
सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, Zoom Call वेबिनारवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) मॉर्गेज लेंडर बेटर डॉममधील जवळपास ९०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामवरून काढून टाकले आहे. बुधवारी हे वेबिनार सुरु होते या वेबिनारदरम्यानचं सीईओ गर्ग यांनी कंपनीतील ९ टक्के कर्मचाऱ्यांनी कामावरून कमी करणार असल्याचे जाहीर केले.

हे कर्मचारी ठरले अनलकी ग्रुपचा भाग

या Zoom Call दरम्यान कंपनीच्या सीईओंनी सांगितले की, जे कर्मचारी आत्ताच्या Zoom Call मध्ये जोडले गेले आहेत ते अनलकी ग्रुपचा भाग बनले आहेत. ज्यांना कामावरून कमी केले आहे. यावर कंपनीचे चीफ फायनेंशिअल ऑफिसर केविन रयान यांनी सांगितले की, बाजारात कंपनीचा होणारा तोटा पाहता कंपनी मालकाने हा दुर्भाग्यपूर्ण निर्णय घेतला आहे.

कंपनीने दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना केले कमी

कंपनीचे सीईओ गर्ग यांनी कर्मचाऱ्यांवर अंडरप्रोडक्टिव होण्याचे कारण देत आपल्या सहकारी आणि ग्राहकांवर चोरीचे आरोप केले होते. न्यूयॉर्कमध्ये मुख्य कार्यालय असणाऱ्या या कंपनीच्या सीईओ दुसऱ्यांदा अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे.

भारत सरकार अशा कर्मचाऱ्यांना करतयं  मदत  

भारत सरकारने कोरोना काळात नोकरी गमावणाऱ्या आणि कर्मचारी राज्य विमा निगमचे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी कोरोना काळात नोकरी गमावणाऱ्या राज्य कर्मचारी विमा निगम म्हणजे Employee’s State Insurance Corporation (ESIC) च्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे जाहीर केले.


 

First Published on: December 6, 2021 3:43 PM
Exit mobile version