राजस्थानमध्ये सासूने सूनेला केली किडनी दान

राजस्थानमध्ये सासूने सूनेला केली किडनी दान

(फोटो प्रातिनिधिक आहे)

सासू म्हटंल का प्रथम डोळ्यासमोर येते ती सूनेशी भांडण करणारी, सूनेचा जाच करणारी आणि सतत सूनेचा छळ करणारी. मात्र याला राजस्थानमधील सासू अपवाद ठरली आहे. राजस्थानमधल्या एका सासूने या नात्याचा कडूपणा दूर करुन त्यांच्या कृतीतून गोडवा दाखवून दिला आहे. या सासूने आपल्या सूनेला किडनी देऊन जीवदान दिले आहे. विशेष म्हणजे लेकीला किडनी देण्यासाठी आई, वडिल आणि भावांनी नकार दिला आणि सासूने आईची जागा घेत सूनेला किडनी देऊन सूनेला जिवदान दिले आहे.

सासूने सूनेला किडनी केली दान

राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातल्या गांधी नगरमध्ये राहणाऱ्या सोनिका देवी (३२) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. गेले वर्षभर त्या डायलिसीसवर जगत होत्या. मात्र त्यांना किडनी ट्रान्सप्लान्ट हा एकमेव पर्याय होता. हा पर्याय सोनिका देवीच्या सासरच्या मंडळींना ही माहिती देण्यात आली. सोनिकाच्या घरच्यांनी ही माहिती तिच्या आई, वडिल आणि भावाला दिली. मात्र त्यांनी त्यावर काहीच पर्याय सुचवला नाही. तसेच तिच्या आई-वडिलांनी आणि भावानी किडनी देण्यास नकार दिला. अखेर सोनिकाच्या सासूने आपली किडनी देण्याचा विचार केला. सोनिकाची सासू गनी देवी (६०) यांनी आपली किडनी आपल्या सूनेला देऊन तिला जिवदान दिले आहे. त्यानंतर सोनिकाचे १३ सप्टेंबर रोजी ऑपरेशन करुन तिला जिवदान दिले आहे. आता सोनिका देवीची प्रकृती उत्तम आहे.

First Published on: October 7, 2018 4:26 PM
Exit mobile version