ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सभेत शेतकऱ्याचा मृत्यू; तरीही सभा सुरु

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सभेत शेतकऱ्याचा मृत्यू; तरीही सभा सुरु

भाजपाचे राज्यसभेतील खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सभेत आलेल्या ८० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा ८० वर्षीय व्यक्ती ८० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी खांडवा जिल्ह्यात भाजपाची सभा होती. दरम्यान येत्या तीन नोव्हेंबरला मध्य प्रदेशात पोटनिवडणुका होणार आहेत. त्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे भाषण सुरु होण्याआधी ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

भाजपाचे राज्यसभेतील खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सभेसाठी आलेल्या एका शेतकऱ्याचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याचे नाव जीवन सिंह असून भाजपाचे पंधानाचे आमदार राम दांगोरे यांचे भाषण सुरु असताना जीवन सिंह ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने खुर्चीतच कोसळले. मुंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अंतिम पवार यांनी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार,“खांडवा जिल्ह्यातील मुंडी येथे रविवारी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. चांदपूर गावात राहणारे जीवन सिंह खास सभेसाठी इथे आले होते. त्यांना अचानक त्रास सुरु झाला व ते खुर्चीतच कोसळले”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन सिंह यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले आहे. स्थानिक नेते सभेला संबोधित करत असताना, शेतकऱ्याचा मृत्यू झाला. जीवन सिंह यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतरही नेत्यांची भाषणे सुरुच होती, असेही काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहून भाषण सुरु

सभेत झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतरही सभा सुरु ठेवण्याच्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. भाजपाने असंवेदनशीलता दाखवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया मंचावर पोहोचण्याआधीच या शेतकऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. सिंधिया यांना जीवन सिंह यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिल्यानंतर, त्यांनी या शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहिली व भाषण सुरुच ठेवले.


‘पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय राज्य शासनाकडे पर्याय नाही’

First Published on: October 19, 2020 9:59 AM
Exit mobile version