खासदार नवनीत राणांना जिवे मारण्याची धमकी

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हनुमान चालीसाचे जर कुठेही वाचन केले तर तिथे येऊन जीवे मारण्याची धमकी अज्ञात व्यक्तींकडून देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. याबाबत त्यांनी दिल्लीतील पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे.

11 वेळा अज्ञात व्यक्तीकडून फोन –

दोन दिवसात तब्बल 11 वेळा अज्ञात व्यक्तीकडून फोन येत असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. मी यामुळे मानसिकदृष्ट्या खचले असून घाबरले आहे. माझ्या घरात देखील भीतीचे वातावरण आहे. माझी पोलिसांना विनंती आहे की, या धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात तो ही चूक पुन्हा करणार नाही, असे नवनीत राणा यांनी पत्रात म्हटले आहे.

28 मे रोजी विदर्भात जाणार –

जेलवारीनंतर प्रथमच राणा दाम्पत्य 28 मे रोजी विदर्भात दाखल होणार आहे. राणा दाम्पत्याचे नागपूर विमानतळावर भव्य स्वागत केले जाणार असल्याचे युवा स्वाभिमान पक्षाने जाहीर केले आहे. नागपूर विमानतळावरून राणा दाम्पत्य रामनगर येथील हनुमान मंदिरापर्यंत रॅली स्वरूपात पोहोचणार आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह सामूहिक हनुमान चालिसा पठण करणार आहे. या सामूहिक हनुमान चालिसा पठणाकरिता नागपूर पोलिसांकडे परवानगी मागितली असून अजून परवानगी मिळालेली नाही, असे युवा स्वाभिमान पक्षाने सांगितले आहे.

1 लाख हनुमान चालिसा वाटप –

नागपुरात हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राणा दामपत्य कार्यकर्त्यांसह अमरावतीला रवाना होनार आहेत. अमरावती जिल्ह्यात तिवसा, मोझरी नांदगावसह अमरावती शहरात अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत होणार असून रात्री 9 वाजता अमरावती येथील दसरा मैदान जवळच्या हनुमान मंदिरात पुन्हा हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. दरम्यान राणा दाम्पत्याने विदर्भात 1 लाख हनुमान चालिसा वाटप करण्याचे निर्धार केला आहे.

First Published on: May 25, 2022 7:25 PM
Exit mobile version