मध्यप्रदेशात लेडी अण्णा नाईक, पत्नीकडून पतीची हत्या, मृतदेह गाडून त्यावर लावलं कलम

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये क्राईम पेट्रोल बघून पत्नीने प्रियकर व त्याच्या मदतीने पतीची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह विहीरीत गाडून त्यावर रोपटं लावल्याची भयंकर घटना ११ महिन्यानंतर उघडकीस आली आहे. फेरन सिंह जाटव असे मृत व्यक्तीचे नाव असून मालती असे त्याच्या आरोपी पत्नीचे नाव आहे.

फेरन सिंह ६ ऑगस्ट २०२० पासून बेपत्ता असल्याची तक्रार मालतीने पोलिसात केली. तसेच पोलीस पतीचा शोध नीट घेत नसल्याचेही तिने न्यायालयात सांगितले. यामुळे आपल्यावर कोणालाही संशय येणार नाही असा तिने विचार केला. पण पोलिसांनी गावकऱ्यांकडे चौकशी केल्यावर मालतीचे गावातील रामअवतार या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी रामअवतार याची चार दिवस चौकशी केली. त्यात रामअवतार याने मालतीच्या सांगण्यावरूनच तिच्या पतीची मित्राच्या साहाय्याने हत्या केलीची कबुली दिली. तसेच क्राईम पेट्रोलवरूनच हत्येचा कट रचल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. नंतर पोलिसांनी विहीर खोदली. त्यात फेरनचा सांगाडा पोलिसांना सापडला. नंतर मालती व रामअवतारला अटक करण्यात आली. तब्बल ११ महिन्यानंतर या गुन्ह्याचा शोध लागला.

First Published on: July 28, 2021 12:41 PM
Exit mobile version