संकटाच्या काळी भावा बस तुझीच मिळाली साथ

संकटाच्या काळी भावा बस तुझीच मिळाली साथ

अंबानी बंधू

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) ने एरिक्सन कंपनीचे थकलेल्या पैशाची परत फेड केली आहे. यामुळे अनिल अंबानी यांची अटक अखेर टळली आहे. अनिल अंबानी यांचे मोठे भाऊ मुकेश अंबानी यांनी कर्जाची परतफेड केली आहे. मोठ्या भावाकडून मिळालेल्या मदतीनंतर अनिल अंबांनी यांनी भावाला मनापासून धन्यवाद केला आहे. “वेळीच मदत केल्याबद्दल व माझ्या बाजूने उभे राहिल्याबद्दल मी मुकेश आणि निता अंबानीचा आभारी आहे.” असे अनिल अंबानी यांनी सांगितले. स्वीडनची दूरसंचार उपकरण बनविणाऱ्या एरिक्सन कंपनीला ४५८.७७ कोटी रुपयांचे पेमेंट थकवल्यामुळे अनिल अंबानी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार होती.

काय आहे प्रकरण

एरिक्सन कंपनीचे आरकॉमवर कर्ज होते. एरिक्सनला १९ मार्चपर्यंत ही रक्कम देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आरकॉम कम्युनिकेशनला दिले होते. मुदतीत ही रक्कम देता आली नसती, तर अनिल अंबनी यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असती. मात्र मुदतीच्या एक दिवस आधी हे पेमेंट करण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार एरिक्सनला ४५८.७७ कोटी रुपयांची परतफेड केली. या आधी आरकॉमने एरिक्सन कंपनीला ११८ कोटी रुपये दिले होते. ही रक्कम मिळाल्याचे एरिक्सनने जाहीर केले होते.

First Published on: March 19, 2019 11:06 AM
Exit mobile version