‘ते’ कंटेनर रिकामेच, मुंद्रा बंदरावर जप्त केलेल्या कंटेनरवर पाकिस्तानचा दावा

‘ते’ कंटेनर रिकामेच, मुंद्रा बंदरावर जप्त केलेल्या कंटेनरवर पाकिस्तानचा दावा

गुजरातमधील मुंद्रा बंदरावर भारतीय अधिकाऱ्यांनी शांघायला जाणाऱ्या मालवाहू जहाजावरील कंटेनर जप्त केले होते. ज्यात धोकादायक पदार्थ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. ते कंटेनर रिकामे असल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने केला आहे.

त्याचबरोबर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने याआधी कंटेनर मधील इंधनाचा उपयोग चीनमधून कराचीत k-2 आणि k-3 या परमाणु उर्जा संयत्रणात करण्यात आल्याचे मान्य केले आहे. तसेच हे रिकामे कंटेनर परत चीनला पाठवण्यात येत होते. या कंटेनरचा उपयोग इंधनाची ने आण करण्यासाठी केला जात होता असे स्पष्ट केले होते.

हे कंटेनर रिकामे होते आणि धोकादायक नसल्याचे घोषित करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. तसेच या कंटेनरमधून रेडिओअॅक्टीव्ह साहीत्य जप्त करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचेही पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने आपल्या स्पष्टीकरणात सांगितले आहे.

 

 

First Published on: November 21, 2021 1:23 PM
Exit mobile version