तिकीट कापल्यानंतर मुरली मनोहर जोशींचा ‘या’ कामासाठी नकार

तिकीट कापल्यानंतर  मुरली मनोहर जोशींचा ‘या’ कामासाठी नकार

मुरली मनोहर जोशी

भारतीय जनता पार्टीचे भीष्माचार्य समजले जाणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने तिकीट नाकारल्यावर आता भाजपचे दुसरे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचंही तिकीट नाकारल्याचे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर हा निर्णय त्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यांना या बद्दल सांगण्यात आले ते सरचिटणीस रामलाल यांचेकडून. मुरली मनोहर जोशी यांचे कानपुर मधून तिकीट नाकारले असून त्यानंतर त्यांनी कानपूरच्या मतदारांसाठी पत्र लिहिले आहे. हे पात्र आज सकाळपासून समाज माध्यमात व्हायरल झाले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे कि भाजपचे सरचिटणीस रामलाल यांनी कानपुर किंवा अन्य मतदारसंघातून निवडणूक लढू नये असे सांगितले आहे.

सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार मुरली मनोहर जोशी यांना पार्टीचे सरचिटणीस रामलाल यांनी पक्ष कार्यालयात येऊन, ‘ मी कानपुर मधून निवडणूक लढविणार नाही असे जाहीर करण्यास सांगितले. ‘ मात्र दुखावलेल्या मुरली मनोहर जोशी यांनी असे न करता मतदारांना पत्र लिहिणे पसंत केले. मुरली मनोहर जोशी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना हा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडून सांगितला जाने अपेक्षित होते. मात्र तसे झाले नसल्याने ते दुखावले गेले.

भारतीय जनता पार्टी ला वाढविण्यात आणि लोकप्रियता मिळवून देण्यात लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. मात्र २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या जेष्ठांना मार्गदर्शक मंडळात टाकण्यात आले होते. अति ज्येष्ठांना तिकीट द्यायचे नाही असे कारण त्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानंतर सत्ता येऊनही राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून हे नेते दूरच राहिले होते.

मुरली मनोहर जोशी यांचे पत्र

दरम्यान भाजपने मुरली मनोहर जोशींबद्दलचा निर्णय अधिकृत घोषित करण्याआधीच मुरली मनोहर यांचे पत्र व्हायरल झाले आहे. त्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे, तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

First Published on: March 26, 2019 11:38 AM
Exit mobile version