SulliDeals नंतर BulliBai अ‍ॅपने मुस्लिम महिला, पत्रकारांना केले टार्गेट, तक्रारीनंतर मुंबई, दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु

SulliDeals नंतर BulliBai अ‍ॅपने मुस्लिम महिला, पत्रकारांना केले टार्गेट, तक्रारीनंतर मुंबई, दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु

SulliDeals नंतर BulliBai एपने मुस्लिम महिला, पत्रकारांना केले टार्गेट, तक्रारीनंतर मुंबई, दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु

शेकडो मुस्लिम महिला आणि पत्रकारांचे फोटो बुल्ली बाई (Bulli Bai) नावाच्या अॅपवर अपलोड केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आता राजकारणं चांगलेच तापले आहे. तर अनेकांनी या सोशल मीडिया अकाऊंटविरोधात सायबर पोलिसांत तक्रार केली आहे. अलीकडेच सुल्ली डिल्स (Sulli Deals) नावाचा असाच एक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आता शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी अधिक आक्रमक झाल्या आहे.  होस्टिंग प्लॅटफॉर्म गिटहबवरील (Hosting Platform GitHub) Bulli bai अॅपवरून शेकडो मुस्लिम महिलांचे आणि पत्रकारांचे फोटो अॅपवर अपलोड करण्यात आलेत. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका पीडित महिला पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, Bulli bai अ‍ॅपवरून महिलांच्या फोटांचा गैरवापर होत आहे.  गितहबवर ‘सुल्ली डील्स’ प्रमाणे ‘बुल्ली बाई’ नावाचा एक ग्रुप तयार करण्यात आलाय. ज्यात मुस्लिम महिलांचे आणि महिला पत्रकारांचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवरून गोळा केले जातात. तसेच या फोटोंचा नंतर ट्विटरवर लिलाव होतो. दरम्यान शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवरून या महिलेला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रीअश्विनी वैष्णव यांना या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे.

अ‍ॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो पोस्ट

याप्रकरणी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून, दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी ट्वीट करत सांगितले की, “मी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रश्मी करंदीकर जी यांच्याशी चर्चा केली आहे. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. मी या प्रकरणात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना हस्तक्षेप करण्याविषयी देखील बोलली आहे. या प्रकारामागे जे लोक दोषी आहेत त्यांना लवकरचं अटक केली जाईल अशी आशा व्यक्त केली आहे.

प्रियंका चतुर्वेदींकडून अटकेची मागणी

माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सुल्लीडील्स सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना लक्ष्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती वारंवार केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे ही शरमेची बाब आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले आहे. असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

केंद्रीय मंत्र्यांनी प्रियंका चतुर्वेदींच्या मागणीची घेतली दखल

प्रियंका चुतर्वेदी यांनी केलेल्या ट्विटची दखल केंद्रीय आयटी मंत्री वैष्णव यांनी घेतली आहे. ”GitHub ने शनिवारी सकाळीच युजर्सला ब्लॉक केले. तसेच याप्रकरणी सीईआरटी आणि पोलिस अधिकारी पुढील कारवाईसाठी प्रयत्न करत आहेत. असं म्हणत चतुर्वेदी यांनी वैष्णव यांचे आभार मानले. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी विनंती केली.


मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटींचा घोटाळा; राज्यपालांचा शिवसेनेला नवा झटका


First Published on: January 2, 2022 10:08 AM
Exit mobile version